MPKV, Rahuri  Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय शेती परिषद

Agriculture Council Rahuri : तृणधान्य वर्षानिमित्त वेगवेगळ्या बाबींवर राज्यभरातील मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांत चर्चा व्हावी, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज (ता. ४) आणि उद्या (ता. ५) दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : तृणधान्य वर्षानिमित्त वेगवेगळ्या बाबींवर राज्यभरातील मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांत चर्चा व्हावी, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज (ता. ४) आणि उद्या (ता. ५) दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, बरी, कोडो आदी तृणधान्यावर मार्गदर्शन आणि चर्चा होईल.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‍घाटन होईल.

कृषी विभागाचे अतिरिक्त सचीव अनुपकुमार यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतरच्या चर्चासत्रात ज्वारी पैदासकार डॉ. आर. बी. घोरपडे (अकोला), डॉ. कुशल बराटे (राहुरी), डॉ. तात्यासाहेब फडतरे (इंदापूर) हे ज्वारी व बाजरीवर मार्गदर्शन करतील. दुपारच्या नाचणी, चिना, बरी यावर मार्गदर्शन होईल.

तिसऱ्या सत्रात मध्य प्रदेशातील शास्त्रज्ञ डॉ. आर. पी. जोशी, महेंद्र छोरिया, शेतकरी अजित भांगरे हे मार्गदर्शन करतील. चौथ्या सत्रात राळा व बर्टी या विषयावर विविध राज्यांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर, शिरीष जोशी, दयाकर राव, नरेंद्र पवार व ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे हे मार्गदर्शन करतील, असे विद्यापीठाचे प्रसारण अधिकारी पंडित खर्डे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT