Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Import Duty : श्रीलंकेकडून कांदा आयात शुल्कात २० टक्के कपात

Onion Tariff Reduction : श्रीलंकेत उत्पादित होणारा कांदा संपुष्टात आल्याने भारतातून कांदा मागविण्यासाठी श्रीलंका सरकारने आयातीवरील शुल्कात २० टक्के कपात केली आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : श्रीलंकेत उत्पादित होणारा कांदा संपुष्टात आल्याने भारतातून कांदा मागविण्यासाठी श्रीलंका सरकारने आयातीवरील शुल्कात २० टक्के कपात केली आहे. भारतीय निर्यातदारांना आता केवळ १० टक्के निर्यात शुल्क द्यावे लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेशनंतर श्रीलंका सर्वात मोठा आयातदार देश आहे. त्यामुळे कांद्याच्या मागणीत वाढ शक्य असून दर स्थिर राहण्यास मदत होईल.

देशातून दरवर्षी साधारणतः २५ लाख टन कांद्याची विविध देशांत निर्यात होते. यात एकट्या श्रीलंकेचा वाटा नऊ टक्के इतका आहे. आयात- निर्यातीच्या धोरणात चढ-उतार होत गेल्याने निर्यातीच्या आकड्यांमध्ये सातत्याने बदल होत गेला. २०२३ मध्ये देशातून १७ लाख टन कांद्याची निर्यात झाली.

आता कांद्यावरील निर्यात शुल्क अवघे २० टक्के असल्याने निर्यातदारांना खुल्या पद्धतीने व्यापार करणे शक्य होत आहे. मात्र, श्रीलंकेने कांदा आयातीवर ३० टक्के शुल्क लागू केले होते. त्यांच्या देशात ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यांत उत्पादित झालेला कांदा आता जवळपास संपण्यावर आहे.

अशा परिस्थितीत कांद्याचे दर वाढल्यास जनतेत असंतोष निर्माण होईल. या गोष्टींचा विचार करून श्रीलंका सरकारने रविवार (ता. १) पासून कांदा आयातीवर केवळ १० टक्केच शुल्क ठेवले आहे. परिणामी, भारतातून आता खरीप (लाल) कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकते. हा कांदा जास्त काळ साठविला जाऊ शकत नाही. आवक वाढल्यावर कांद्याचे दर कोसळण्याची भीती काही अंशी कमी झाली आहे.

श्रीलंकेत स्थानिक कांदा उपलब्ध असल्याने १३ ऑगस्टपासून प्रतिकिलो ३० रुपये आयात शुल्क होते. त्याला स्थानिक लेव्ही असे संबोधले जाते. आता श्रीलंकेने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्याने देशातील खरीप कांद्याचे दर स्थिर राहतील. श्रीलंकेला भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्याला अधिक चालना मिळण्यास मदत होईल.
विकास सिंग, उपाध्यक्ष, भारतीय फलोत्पादन निर्यात संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Dam Outflow : कोयनासह प्रमुख धरणांतून विसर्गात घट

Students Protest: झेन अल्फांनी वाकवले जिल्हा परिषद प्रशासन

Crop Insurance : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभाग

Kharif Sowing Update: धाराशिवमध्ये खरीप पेरण्या ८८ टक्क्यांवर; टक्केवारी घसरली तरी सोयाबीनसह पिकांची जोमदार वाढ

Ring Road Project : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT