Sankrant Festival  Agrowon
ॲग्रो विशेष

Sankranti Festival : संक्रांतीसाठीची सुगडी बनिवण्याच्या कामाला वेग

Makar Sankranti 2024 : संक्रात सण तीन आठवड्यांवर आल्याने अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील कुंभारवाड्यात तयार करण्यात येणाऱ्या, संक्रातीसाठी लागणारी सुगडी (लहान आकाराची मडकी) बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : संक्रात सण तीन आठवड्यांवर आल्याने अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील कुंभारवाड्यात तयार करण्यात येणाऱ्या, संक्रातीसाठी लागणारी सुगडी (लहान आकाराची मडकी) बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मातीच्या या सुगड्यांना जिल्ह्यातून मागणी वाढली आहे.

कुंभारवाड्यातील पाच ते सहा कुटुंबांमधून सुमारे एक ते दीड लाखाहून अधिक सुगडी तयार झाली आहेत. पुढील आठवडाभरात आणखी लाखभर सुगडी तयार होतील. पारंपरिक लाकडी चाकावर सुगडी बनवत असताना येथील कारगिरांनी विजेवर चालणाऱ्या मोटारीच्या चाकावर सुगडी बनविण्यास सुरुवात केल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.

एक कारागीर दिवसाला सरासरी ७०० ते ८०० सुगडी बनवतो. ठोक स्वरूपात एका सुगड्याला अडीच ते तीन रुपये किंमत मिळते तर किरकोळ बाजारात पाच सुगड्यांचा संच ३० ते ४० रुपयांना विकला जातो, असे कुंभार व्यावसायिक साहेबराव काळे यांनी सांगितले.

संक्रातीला पूजा करण्यासाठी वाण म्हणून महिला वापरत असलेली मातीची सुगडी बनविण्याच्या कामाला येथील कुंभारवाड्यात दिवाळीनंतर सुरुवात होते.

येथील काही कुंभार व्यवसायिकांनी पारंपरिक सुगडी बनवत असताना त्याला व्यावसायिक स्वरूप देत संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुगड्यांना ठोक स्वरूपात ग्राहक शोधण्याचे काम केले.

व्यापाऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. खेड, जुन्नर, शिरूर, मावळ याचबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा, तळेगाव दाभाडे शहरातून सुगड्यांच्या मागणीची आगाऊ नोंदणी झाली आहे.

संपूर्ण कुंभारवाड्यात आतापर्यंत एक ते दीड लाख सुगडी तयार झाली असून आठवडाभरात आणखी एक लाख सुगडी तयार होतील, असे साहेबराव काळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT