Onion Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Onion : शिरूरमध्ये उन्हाळ कांदा साठवणुकीला वेग

Onion Storage : सरकारच्या निर्यातीबाबतच्या चुकीच्या धोरणांमुळे सध्या बाजारात कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नाही.

Team Agrowon

Pune News : तालुक्यात उन्हाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा काढणीचे काम वेगाने सुरू आहे. सरकारच्या निर्यातीबाबतच्या चुकीच्या धोरणांमुळे सध्या बाजारात कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नाही.

यामुळे आगामी काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल आणि भांडवली खर्च निघून नफा शिल्लक राहील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांची गोलटी, मध्यम, मोठा कांदा असे प्रकार करून वेगवेगळ्या पद्धतीने साठवणूक करण्याची लगबग सुरू आहे.

गारपिटीचा पाऊस, सतत बदलत्या हवामानामुळे पिकांवर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव, रासायनिक खते व औषधांच्या गगनाला भिडलेल्या किमती, वाढलेली मजुरी, शेतकरी विद्युत रोहित्र चोरीमुळे हैराण झालेले असताना त्यातच सुरू झालेले भारनियमन यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करत मोठ्या कष्टाने शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेतात.

मात्र ऐन विक्रीच्या वेळी कांद्याचे बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. कांद्याला एकरी सरासरी ४५ ते ५० हजार रुपये खर्च येतो. सध्या कांद्याला प्रतवारी नुसार १३ ते १६ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे.

यामधून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे कवडीमोल भावाने कांदा विक्री करण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. तर काही शेतकऱ्यांनी आगामी काळात कांद्याला चांगला भाव मिळेल आणि भांडवली खर्च निघून नफा शिल्लक राहील या अपेक्षेने कांदा साठवणूक करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

खत औषधांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. कांदा पिकाला जवळपास एकरी ४५ ते ५० हजार रुपये भांडवल गुंतवावे लागते. त्यातून चांगले उत्पादन निघाले तर बाजारभाव मिळत नाही. याला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे.
- शरद पडवळ, प्रगतिशील शेतकरी
सध्या बाजारात उन्हाळी नवीन कांद्याला प्रतवारीनुसार १३ ते १६ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा साठवणूक करण्याकडे कल असल्याचे दिसत आहे.
- महेंद्र वाळुंज, कांदा व्यापारी
पारंपरिक पद्धतीने कांदा साठवणूक केल्यास त्याला कोंब फुटतात. परिणामी कांदा जास्त काळ टिकत नाही. हवा खेळती राहील अशा शास्त्रीय पद्धतीने कांद्याची साठवण करून योग्य काळजी घेतली तर कांद्याचा दर्जा चांगला राहतो. कांदा चाळ उभारणीसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.
- नंदू जाधव, कृषी साहाय्यक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT