Threshing of crops Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Harvesting : रब्बी पीक काढणीला गती

Rabi Season : सांगली जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी व मळणीचा कामे करण्यात शेतकरी गुंतला आहे. ज्वारीची काढणी ५० टक्के उरकली असून गव्हाची ३० तर हरभऱ्याची ५० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी व मळणीचा कामे करण्यात शेतकरी गुंतला आहे. ज्वारीची काढणी ५० टक्के उरकली असून गव्हाची ३० तर हरभऱ्याची ५० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. मात्र, पावसाअभावी रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली.

यंदा मॉन्सूनचा पाऊस अपुरा झाला. तर परतीच्या पावसाने दडी मारली. याचा फटका रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात १ लाख ५६ हजार ६१५ हेक्टरवर पेरा झाला. ज्वारीची १ लाख ०९ हजार ४७० हेक्टरवर, गव्हाची १३ हजार ८०७ हेक्टरवर तर हरभऱ्याची १६ हजार ३३४ हेक्टरवर पेरणी झाली.

जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, मका, गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. कारखान्यास गाळपास ऊस गेल्यानंतर गहू आणि हरभरा पिकांची उशिरा पेरणी केली होती.

परंतु कारखान्यास वेळेत ऊस गाळपास गेला नाही. त्यातच मात्र, यंदा पाणीटंचाई असल्याने गहू आणि हरभरा पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. गेल्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आगाप पेरणी झालेल्या ज्वारी, हरभरा आणि गव्हाची काढणी सुरू झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून काढणीला गती आली आहे.

सध्या शिवारात ज्वारी, हरभरा आणि गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. ज्वारीची काढणी ५० टक्के, गव्हाची ३० टक्के आणि हरभरा काढणी ५० टक्के पूर्ण झाली आहे. उशिरा पेरणी केलेला गहू पक्वता झाली आहे. वाळवा, पलूस कडेगाव, शिराळा, मिरज या तालुक्यांतील शेतकरी रब्बी ज्वारीचा कडबा जनावरांसाठी रचून ठेवताना दिसत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Pest Management: सद्यःस्थितीत कपाशीवर आढळणाऱ्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

Agriculture Department Issue: ऐन हंगामात कृषी विभागाची हाराकिरी

Global Onion Export: धोक्याची चाहूल, उचला योग्य पाऊल

Rainfall Deficit: नद्यांनी वेढलेल्या पाणीदार शिवारात पावसाची ‘आस’

Farmer Company Fraud: शेतकरी कंपन्यांची सव्वा कोटीची फसवणूक

SCROLL FOR NEXT