Cotton Project Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : कापूस उत्पादन वाढीसाठी १७५ एकरांवर विशेष प्रकल्प

Cotton Production : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व गांधीली स्थित एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यात १७५ एकरांवर कापूस उत्पादन वाढीसाठीचा विशेष प्रकल्प राबविला गेला.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chh. Sambhajinagar News : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व गांधीली स्थित एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यात १७५ एकरांवर कापूस उत्पादन वाढीसाठीचा विशेष प्रकल्प राबविला गेला. तीन तंत्रज्ञानाचा संगम घडवून राबविल्या गेलेल्या या प्रकल्पाचे फलित कापसाच्या राहिलेल्या वेचणीनंतर स्पष्ट होणार आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या मार्गदर्शन व समन्वयातून एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण या पाच तालुक्यांतील ३१ गावांतील ८९ शेतकऱ्यांच्या १७५ एकरांवर कापूस उत्पादन वाढीसाठी विशेष प्रकल्प राबविला गेला.

या प्रकल्पात गंगापूर तालुक्यातील १० गावांतील ३०, वैजापूर तालुक्यातील ७ गावांतील २५, कन्नड तालुक्यातील ११ गावांतील २७, खुलताबाद तालुक्यातील २ गावांतील ६, तर पैठण तालुक्यातील एका गावातील एक शेतकरी सहभागी झाला होता. या विशेष प्रकल्प अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रत्येक प्रक्षेत्रावर आतापर्यंत चार प्रक्षेत्र भेटी घेण्यात आले.

चार शेतीदिन कार्यक्रम व आजवर सहा पीक कापणे प्रयोग घेण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर प्रकल्पांतर्गत प्रात्यक्षिक प्लॉटही घेण्यात आला. विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या उत्तम कापूस व्यवस्थापन एकदिवसीय कार्यशाळेच्या वेळी शेतकऱ्यांनी या प्लॉटला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणीही केली.

प्रकल्पात वापरले तीन तंत्रज्ञान

कापूस उत्पादन वाढीसाठीच्या विशेष प्रकल्पात शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर घन पद्धतीने कापूस लागवड, सघन कापूस लागवड आणि दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. घनपद्धतीने कापूस लागवडीत कपाशीतील अंतर ३ बाय १ फूट तसेच सघन कापूस लागवड पद्धतीत कपाशीचे अंतर ३ फूट बाय ९ इंच सोबत वाढरोधकाचा वापर करण्यात आला. घनपद्धतीने कपाशी लागवड ९ एकरांवर, तर सघन पद्धतीने कापूस लागवड तब्बल १४५ एकरांवर करण्यात आली.

आतापर्यंतच्या माहितीनुसार सहभागी शेतकऱ्यांना ४० ते ४५ टक्के इतरांच्या तुलनेत उत्पादन वाढ मिळाली आहे. पुढील वर्षी अशा पद्धतीने कपाशी लागवडीचा विस्तार केल्या जाईल.
- डॉ. के. ए. धापके, संचालक, एमजीएम हिल्स, गांधेली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT