Fruit  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Export : फळ पिकांची निर्यात, प्रक्रियेवर असेल विशेष लक्ष

फळ पिकांची प्रक्रिया व निर्यात वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याला आपले प्राधान्य असेल, असे मत जालना जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी ॲग्रोवनशी बोलताना व्यक्त केले.

Team Agrowon

Jalna News : फळ पिकांची प्रक्रिया व निर्यात वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याला आपले प्राधान्य असेल, असे मत जालना जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी ॲग्रोवनशी बोलताना व्यक्त केले.

जालना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पद गत अनेक महिन्यापासून रिक्त होते. या पदावर नगर जिल्ह्यातून पदोन्नतीने गहिनीनाथ कापसे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने या पदाला लागलेले प्रभारी पदाची ग्रहण संपले आहे.

गहिनीनाथ कापसे नगर जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकारी पदावर कार्यरत होते त्याआधी त्यांनी वर्धा जिल्ह्यातही प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले आहे अनुभव गाठीशी असल्याने व जालना जिल्ह्यात कृषीमध्ये काम करण्यास असलेल्या संधी लक्षात घेता श्री कापसे यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

श्री. कापसे म्हणाले, की जालना जिल्ह्यात मोसंबी, द्राक्ष, आंबा आदी फळपिकांचे दखलपात्र क्षेत्र आहे. फळ पिकांमध्ये निर्यात व प्रक्रिया या दोन विषयांवर काम करण्यास मोठी संधी असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे.

याविषयी तज्ञांशी व जाणकार व्यक्तींशी आपला संवाद झाला असून आणखी संवाद करून निर्यात वृद्धी व प्रक्रियेला कशी चालना देता येईल यावर आपले विशेष लक्ष असेल.

जबाबदारीला न्याय देताना आवश्यक व दखलपात्र काम करण्यावर आपणा भर असेल असेही श्री कापसे म्हणाले.

जालना जिल्ह्यातील मोसंबीला भौगोलिक मानांकन प्राप्त आहे हे विशेष. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्याची विभागीय खरीप आढावा बैठक जालना येथे कृषी आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच श्री. कापसे यांना बैठकीत सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

Mahabeej Golden Jubilee: ‘महाबीज’चा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात

Maharashtra Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट; विदर्भात शनिवारपासून काही भागात वादळी पावसाचा अंदाज

सोनसवाडी शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करा

SCROLL FOR NEXT