Manisha ovhale Agrowon
ॲग्रो विशेष

Swacchata Abhiyan : स्वच्छतेसाठी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान

Team Agrowon

Solapur News : केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारी मुक्त अधिकचे ध्येय साध्य करण्यासाठी गाव स्तरावर वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयाची बांधकाम तसेच सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी राज्यात ३० ऑक्टोबर पासून विशेष स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गावात हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे. या विशेष अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय बांधणे शिल्लक आहे,

अशा कुंटुबाची यादी तयार करून त्यांना शौचालय बांधकामाचा लाभ तसेच, सांडपाणी व्यवस्थापनासाठी वैयक्तिक शोषखड्डे करण्यावर भर् देणे, घनकचऱ्यासाठी खतखड्डे तयार करून व्यवस्थापन करणे. तसेच प्‍लास्टिक संकलनासाठी सेग्रीकेशन शेड, कचरा उचलण्‍यासाठी ट्राय सायकल आवश्‍यक आहे.

यासाठी बीडीओ, विस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील गावांचे नियोजन करून गावे हागणदारी मुक्त यासाठी यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावे दत्तक देऊन चाळीस दिवसाच्या अभियानातून गावे शाश्वत स्वच्छ करावेत, असे आवाहन आव्हाळे यांनी केले आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही आव्हाळे यांनी केले आहे.

२२ डिसेंबरला विशेष ग्रामसभा

हागणदारी मुक्त अधिक साठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये येत्या २२ डिसेंबर २०२३ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावांना मान्यता देणे, तसेच शौचालय बांधकामासाठी प्रबोधन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे, ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी शौचालय बांधकाम होण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करणे.

१ जानेवारी २०२४ नंतर गावात एकही कुटुंब उघड्यावर शौचास् जाणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून ग्रामस्थांना या संदर्भात प्रबोधन करणे, तसेच हागणदारी मुक्त अधिकसाठी लागणारे ठराव, व्हिडिओ चित्रीकरण आदी विषय विशेष ग्रामसभेत घेण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT