Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सोयाबीनचं उत्पादन चांगल पण दरचं नाही, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलं

Agriculture Department : कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरिपाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी ५१.५९ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे, भात पिकाखाली १४.११ लाख हेक्टर क्षेत्र आहे.

sandeep Shirguppe

Soybean MSP Rate : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले आहे परंतु खर्च आणि उत्पन्नाचे गणित बिघडल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहेत. सोयाबीन हमीभावाने विकले जाण्याची अपेक्षा असताना बाजारभाव हमीभावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ८०० रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे. एकरी ८.५ क्विंटल उत्पादनाचा विचार करता, शेतकऱ्यांना एकरी साडेसहा हजार रुपयांचा फटका बसत आहे. हा बाजारभाव असाच राहिल्यास सोयाबीन उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

काही खरीप पिकांचा हंगाम पूर्ण होऊन शेतीमाल बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. पिकाची कापणी मळणी करून सोयाबीन, मका, बाजरी, भात, शेतीमाल बाजारपेठेत नेण्याची लगबग शेतकऱ्यांत पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात भाताचे ९० हजार हेक्टर, सोयाबीनचे ४० हजार हेक्टर क्षेत्र होते. पीक काढणीला आले असताना अंतिम टप्प्यात पावसाने भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची नाराजी झाली आहे.

सोयाबीनचे उत्पादन आणि खर्चाचे गणित करता, पिकाची पूर्व मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, आंतरमशागत, काढणी, मळणी, वाहतूक एकत्रित अंदाजित एकरी खर्च २५ हजारांच्या घरात जातो, तर दुसरीकडे सोयाबीनचे सरासरी ८.५ क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज आणि त्याचा बाजारातील शेतीमालाचे दर यांचा एकरी ४००० रुपये बाजारभाव पाहता सोयाबीन पिकापासून शेतकऱ्यांना एकरी ३४ हजार रुपये उत्पन्न होऊ शकते.

या उत्पन्नातून पिकाचा उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्यांकडे एकरी केवळ ९९५० रुपये शिल्लक राहतात. अतिपावसाने पीक काळे पडलेने चार पैसेसुद्धा पदरात पडत नसल्याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

राज्यात खरीप पीक सर्वाधिक

३५ टक्के क्षेत्र एकट्या सोयाबीन या पिकाखाली आहे. भात या पिकाखाली १०.३ टक्के क्षेत्र आहे. १४ ऑक्टोबर २०२४ च्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरिपाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी ५१.५९ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे, भात पिकाखाली १४.११ लाख हेक्टर क्षेत्र आहे. या हंगामात राज्यात सोयाबीनचे सात कोटी ३२ लाख ७१ हजार क्विंटल, तर भाताचे तीन कोटी ४३ लाख ९४ हजार क्विंटल उत्पादनाचा अंदाज आहे.

हमीभावाने खरेदी नाहीच

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावानुसार सोयाबीन पिकासाठी प्रतिक्विंटल ४८९२ रुपये, भात पिकासाठी २३०० रुपये, मका पिकासाठी प्रतिक्विंटल २२२५ रुपये हमीभाव आहेत. केंद्र या किमती जाहीर करीत असले, तरी या किमतीने शेतीमाल खरेदी होत नसल्याने बाजारभाव किमतीपेक्षा कमी राहिल्याची स्थिती आहे. या पिकांच्या प्रत्यक्ष बाजारभावाचा विचार करता, सोयाबीनला प्रतिक्विंटल ४१०० रुपये, तर मका या पिकांचे बाजारभाव २०५६ रुपये एवढे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT