Soybean Procurement agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : कोल्हापुरात सोयाबीन खरेदी फक्त १ हजार ६०० क्विंटल; खरेदीचा आज शेवटचा दिवस

Soybean Rate : हमीभावाने सोयाबीन खरेदीचा गुरूवार(ता.०६) शेवटचा दिवस आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ४५ हजार हेक्टर सोयाबीन पेरणीची नोंद झाली.

sandeep Shirguppe

Soybean Procurement Kolhapur : हमीभावाने सोयाबीन खरेदीचा गुरूवार(ता.०६) शेवटचा दिवस आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ४५ हजार हेक्टर सोयाबीन पेरणीची नोंद झाली. परंतु सोयाबीन खरेदी मात्र, १६०४ क्विंटल झाली आहे. जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्रे गैरसोयीची झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे. 'नाफेड'च्या कोल्हापूर व व्हन्नाळी-कागल केंद्रांत १६०४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली.

जिल्ह्यातील ज्या भागात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते त्याच भागात केंद्र नसल्यामुळे शेतकऱी गोंधळात पडले. तर काही ठिकाणी 'पीक पाहणी'त सोयाबीन नोंद राहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आला नाही. शासकीय गोदामापर्यंत सोयाबीन पोहोचविण्याचा खर्च व खरेदी केलेल्या सोयाबीनच्या 'स्वीकृती 'मधील अडचणीमुळे खरेदीदार संस्थाही उत्साही नसल्याचे कोल्हापूर जिल्ह्यात पहायला मिळालं.

"कोल्हापूर जिल्ह्यात खरेदी केंद्रे कुठे आहेत याबाबत उशिरा अनेक शेतकऱ्यांना समजले. यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विक्री करण्याचा पर्याय समोर असल्याने अनेकांनी आपल्या सोयीने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली". अशी माहिती शेतकरी श्रेणिक खड्ड यांनी दिली.

नियमानुसार सोयाबीन खरेदी केंद्रांना ५० किलोमिटरपर्यंतची वाहतूक मर्यादा देण्यात आली आहे. शासनाचे आजरा येथे सोयाबीन खरेदी केंद्र आहे. तर इचलकरंजी येथे गोदाम आहे. आजरा ते इचलकरंजी १०० किमीचे अंतर असल्याने संबंधित ठेकेदार तोट्यात येऊन वाहतूक कसा करेल हाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

किसान भात-नाचणा खरेदी-विक्री संघातील सोयाबीन खरेदी केंद्रात गडहिंग्लज तालुक्याती १२ शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक खर्च परवडत नसल्याने सोयाबीन दिलेले नाही, असे अध्यक्ष रोहित नार्वेकर यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT