Soybean Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market Rate : सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली

Soybean Market Price : शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली आले आहे. हमीभाव ४६०० रुपये असून सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपये दर मिळत आहे.

Team Agrowon

Yavatmal News : शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली आले आहे. हमीभाव ४६०० रुपये असून सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपये दर मिळत आहे. सोयाबीन शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक आहे.

दसऱ्याला घरात येणारे पीक विकून पुढचा शेतीचा खर्च सोयाबीनवर अवलंबून असतो. यंदा सोयाबीन उत्पादकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. अजूनही संकटे संपलेली नाही. शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उत्पादनावर आधारित शेतीमालाच्या दरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

सध्या सोयाबीन शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. जिल्ह्यात सर्वाधीक पेरा कापसाचा झाला आहे. त्या खालोखाल सोयाबीनचा पेरा आहे. सोयाबीन शेतकऱ्यांच्या नगदी पिकातील आहे. हे पीक विकून शेतकरी कापूस किंवा तुरीचा हंगाम काढतो. सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होते.

यंदा अतिवृष्टी, पूर तसेच रोगराईने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातून वाचलेले पीक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे. जेमतेम सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात यायला सुरुवात झाली आहे. अशातच सोयाबीनचे दर कोसळले आहे.

शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. जिल्ह्यात कुठेही शासकीय धान्य खरेदी सुरू झालेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याचा धोका वाढला आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT