MSP Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : शिराढोणला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणार

Soybean Procurement : शासनाकडून सोयाबीन हमीभाव केंद्रामधून खरेदी सुरु करण्यात येत आहे. खासगी आडत्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे.

Team Agrowon

Dharashiv News : शासनाकडून सोयाबीन हमीभाव केंद्रामधून खरेदी सुरु करण्यात येत आहे. खासगी आडत्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

एकता सहकारी संस्थांकडून कळंबमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरु करत आहे. परंतु, कळंब शिराढोण परिसरापासून पंचवीस किलोमीटर अंतर आहे. शेतकऱ्यांना केंद्रामध्ये विक्री करण्यासाठी आॅनलाइन रजिस्ट्रेशन करुन सिरीअल प्रमाणे नंबर आल्यावर सोयाबीन स्वखर्चाने कळंबला घेऊन जावे लागणार होते.

सिरीअलप्रमाणे नंबर असल्याने एका गावातून फक्त एकाचाच नंबर येत असल्याने एकट्यासाठी माल घेऊन जाण्याासठी वाहतुकीचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांना द्यावा लागत होता.

शिवाय मोजमापसाठी नंबर असल्याने दिवसभर थांबावे लागणार असल्याने वाहन मालकांना जादा भाडे द्यावे लागणार होते. खरेदी विक्री संघ कळंबच्या शिराढोण येथील उपबाजार समितीतील गोडाऊनमध्ये सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिराढोण परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपबाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करावीत.
- श्रीधर गिरे, सचिव, खरेदी विक्री संघ, कळंब
हमीभाव केंद्र सुरु करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च, वेळ वाचणार आहे. तसेच येथील बाजारपेठेवरही सकारात्मक परिणाम होईल.
- नितीन माळी, शिराढोण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Issues: उद्दिष्टात घट, गोंधळात वाढ

Local Varieties Management Workshop: आज ‘वनामकृवि’त स्थानिक वाणांच्या व्यवस्थापनावर कार्यशाळेचे आयोजन

Maharashtra Irrigation Conference: बेलेवाडी- काळम्मात उद्यापासून महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित

Banana Crop Shredding Machine: यंत्राद्वारे केळी खोडाची कुट्टी

Pipeline Irrigation Policy: शेतीला बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठ्याचे धोरण

SCROLL FOR NEXT