Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damage : अतिवृष्टीमुळे काढणी केलेल सोयाबीन पाण्यात

Crop Loss : यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आणि ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी पावसाची दमदार एंट्री झालेली आहे.

Team Agrowon

Omerga News : ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून सलग पाच दिवस पाऊस सुरू असल्याने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शुक्रवारी (ता. चार) मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दैना उडाली आहे. दरम्यान, नारंगवाडी, मुळज महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने काढणी पश्चात असलेले सोयाबीन पाण्यात गेले आहे.

यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आणि ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी पावसाची दमदार एंट्री झालेली आहे. शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटे झालेल्या पावसाने शेतातील पिकांतून पाणी वाहत होते. परिणामी सोयाबीनचे पीक पाण्यात आहे.

नारंगवाडी शिवारातील शिवाजी फत्तेपुरे, बब्रुवान पवार, सुरेश घंटे, निवृत्ती चिकुंद्रे, दिगंबर पाटील, हेमंत पाटील, परमेश्वर घंटे, दिगंबर पवार आदी शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. तर, सावळसूर शिवारात रात्रीतून झालेल्या पावसात सोयाबीनच्या नुकसानीचे चित्र पाहून बाळू माशाळ, महादेव बिराजदार, भालचंद्र बिराजदार, सूर्यकांत सूर्यवंशी, संतोष पवार, सुरेंद्र चिंचोळे आदी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

दरम्यान, मुळज महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेत शिवारातील पिकांची, फळबागांच्या नुकसानीचे चित्र शेतकऱ्यांच्या वेदना वाढवणारे आहे. उमरगा महसूल मंडळातही मुसळधार पावसाने चांगलीच दैना उडाली आहे. वीज यंत्रणा कोलमडल्याने दुरुस्तीच्या कामासाठी विलंब होत आहे.

पाच दिवसांत १३९.६० मिलिमीटर पाऊस

ऑक्टोबर महिन्याची उमरगा तालुक्याची पावसाची सरासरी ८१ मि.मी आहे, मात्र प्रत्यक्षात पहिल्या पाच दिवसांत १३९.६० मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या तुलनेत १७२.२ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील १६ तलाव यापूर्वीच भरले आहेत.

शनिवारी पहाटेच्या दमदार पावसाने तुरोरी मध्यम प्रकल्पाचे तीन गेटमधून पाणी ओसंडून वाहत आहे. तर, मुरळी, कदेर, सरवडी साठवण तलाव भरले आहेत. बेन्नीतुरा मध्यम प्रकल्पही भरलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT