Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : खानदेशात रब्बीत सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

Soybean Sowing : खानदेशात रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढणार आहे. पेरणी ३००० हेक्टरवर होवू शकते.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढणार आहे. पेरणी ३००० हेक्टरवर होवू शकते. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २००० हेक्टरपर्यंत होणार असल्याची माहिती आहे.

धुळे व नंदुरबारात रब्बी सोयाबीनची पेरणी फारशी केली जात नाही. या भागात कृत्रीम जलसाठाधारक सोयाबीनएेवजी भुईमुगास पसंती देतात. थंडी अधिक पडेल व सोयाबीनचे उत्पादन घटेल, अशी भीती काही शेतकऱ्यांना आहे. परंतु प्रतिकूल स्थितीतही अनेक शेतकरी सोयाबीनचे चांगले उत्पादन रब्बीत घेत आहेत. नंदुरबार, धुळ्यातील पेरणी स्थिर राहील, असेही संकेत आहेत.

जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीनची पेरणी नोव्हेंबर महिन्यातच सुरू होणार आहे. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात येईल, असे दिसत आहे. पाण्याची अडचण नसल्याने पेरणी वाढणार आहे. इतर पिकांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन करण्याचे नियोजन केले आहे.

सोयाबीनचे दर यंदा खरिपात अस्थिर आहेत. परंतु सोयाबीन उत्पादन कमी होईल. कारण पावसात पिकहानी होत आहे. किमान ४१०० व कमाल ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या आहे. नंतरही दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पेरणीच्या वेळेसही दर ४१०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

यामुळे सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. परंतु या महिन्यात दरात सुधारणा झाली असून, दर ४१०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. दर टिकून राहतील व अधिकचा नफा मिळेल, या नियोजनातून शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. सोयाबीनची पेरणी धुळे, नंदुरबारात वाढण्याची शक्यता आहे. कारण सर्वच प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे.

पेरणी गिरणा, तापीकाठालागत अधिक

सोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात वाढणार आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीन रावेर भागात कमी असतो. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात उन्हाळ सोयाबीन पीक असणार आहे. पेरणी नोव्हेंबर व डिसेंबरच्या सुरवातीलाच अनेकांनी करण्यासाठी नियोजन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT