Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean : सोयाबीन आणि युरियाची मात्रा

सोयाबीन हे नत्र स्थिरीकरण करणारे पीक आहे. या पिकास युरिया खत दिल्यास नत्राचे प्रमाण वाढून पिकाची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते.

डॉ. सोमिनाथ घोळवे

सोयाबीनमध्ये युरियाचा वापर (Urea Use In Soybean) टाळायला हवा. त्याकरिता कृषी विभागाकडून जागृतीची खूप आवश्यकता आहे. फोटोमध्ये (मुंडेवाडी ता. केज जिल्हा. बीड) दिसणारे सोयाबीन खूपच तेजदार आहे... का? तर या सोयाबीनला युरियाचा डोस (Urea Dose In Soybean) एकच नाही तर दोन देण्यात आले आहेत. आमच्या परिसरात सोयाबीनला युरियाचा डोस देण्याची कहाणी फक्त एकाच शेतकऱ्यांची नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले (Soybean Sowing) आहे, त्यांपैकी जवळ जवळ ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांनी युरियाचा डोस दिल्याचे आढळून येते.

सोयाबीनला युरियाचा डोस का दिला जातो, असे विचारले असता, सोयाबीनची वाढ चांगली वाढ व्हावी चांगली वाढ झाली तर चांगले पीक येईल म्हणून हा डोस दिला जातो, असे ऐकण्यास मिळते. कृषी सेवा केंद्रावाल्यांनी सोयाबीनला युरियाचा डोस द्यावा लागतोच, अशी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून टाकली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनला ३० ते ३५ दिवसांचे असताना पहिला डोस आणि ५० ते ६५ दिवसांच्या दरम्यान दुसरा डोस देतात. काही शेतकरी पाऊस झाला की लगेच युरियाचा मात्रा देतात.

वास्तव काय आहे?

सोयाबीन हे नत्र स्थिरीकरण करणारे पीक आहे. या पिकास युरिया खत दिल्यास नत्राचे प्रमाण वाढून पिकाची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होऊन परिणामी उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला युरिया खताची मात्रा देऊ नये. किंवा याबाबत तज्ज्ञांचा सल्ला तरी घ्यावा.

सोयाबीन पीक हे कडधान्य वर्गातील आहे. त्यामुळे झाडांच्या मुळावर गाठी असतात. या गाठीद्वारे हवेतील उपलब्ध असलेले ७८ टक्के नत्र शोषून सोयाबीन पिकास उपलब्ध होते. त्यामुळे सोयाबीन पिकाला युरिया नत्राची मात्रा देण्याची आवश्यकता नाही.

सोमिनाथ घोळवे, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT