Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : मोहोळमध्ये गहू, हरभरा, कांदा, ज्वारीचा २३ हजार हेक्टरवर पेरा

Rabi Season 2024 : गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या कडक थंडीमुळे गहू, हरभरा, कांदा व ज्वारी या पिकांना अच्छे दिन आले आहेत.

Team Agrowon

Solapur News : गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या कडक थंडीमुळे गहू, हरभरा, कांदा व ज्वारी या पिकांना अच्छे दिन आले आहेत. या पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने त्यांची वाढ जोमात सुरू आहे. मोहोळ तालुक्यात वरील चार पिकांची २३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आहे. ज्वारी वगळता अद्याप गहू, हरभरा, कांद्याची लागवड सुरूच आहे.

मोहोळ तालुक्यात चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येणारा उन्हाळा सुसह्य होणार आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने अद्याप काळ्या व उच्च प्रतीच्या जमिनींना वाफसा नाही. त्यामुळे गहू, हरभरा यांच्या पेरणी व लागवडीला उशीर झाला आहे. जसा वाफसा येईल तशा पेरण्यावर लागवडी सुरू आहेत.

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वापशावर आल्या होत्या त्यांनी लागवडी व पेरणी करून घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून कडक थंडीला सुरवात झाली आहे. वरील चार ही पिकांना जेवढी थंडी तेवढी त्यांची वाढ जोमात होते. सध्या मोहोळ तालुक्यात ज्वारीची कोळपणी तर गहू, हरभरा, कांद्याची खुरपणी व फवारणी सुरू आहे.

पाऊस जादा झाल्याने व लवकर जमिनीला वापसा न आल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच नासून गेला. ही थंडी वरील चार पिकांना जरी फायदेशीर असली तरी कलिंगड, खरबूज, भाजीपाला, द्राक्ष यांना ही थंडी हानिकारक आहे.

थंडीमुळे या पिकावर दवण्या, भुरी व इतर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढतो, उत्पादन अपेक्षे प्रमाणे मिळत नाही. तसेच केळी व फुलशेती लाही ही थंडी हानिकारक आहे.

दरम्यान कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विविध योजनात सहभाग वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचनासाठी तसेच विविध योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागाने मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधी पर्यंत सुरू राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT