Sowing  agrowon
ॲग्रो विशेष

Summer Soybean Sowing : खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी सुरू; क्षेत्र स्थिर राहणार

Soybean Sowing : खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा स्थिर राहणार आहे. पेरणी २४०० हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे १९९ ते २१०० हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा स्थिर राहणार आहे. पेरणी २४०० हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे १९९ ते २१०० हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

धुळे व नंदुरबारमध्ये उन्हाळ सोयाबीनची पेरणी फारशी केली जात नाही. या भागात कृत्रीम जलसाठाधारकांनी सोयाबीनऐवजी भुईमुगास पसंती दिली आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीनची पेरणी सुरू आहे. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन केले.

सोयाबीनचे दर यंदा खरिपात अस्थिर होते. किमान ३६०० व कमाल ४८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर अनेकांना मिळाला. नंतरही दर अस्थिरच होते. पेरणीच्या वेळेसही दर ४८०० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटल होते. यामुळे सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. परंतु दरात पडझड झाली.

गिरणा, तापी काठालागत पेरणी अधिक

सोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर भागात सोयाबीन कमी आहे. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागांत सोयाबीन पीक आहे. अनेकांचे सोयाबीन पीक आठ ते १० दिवसांचे झाले आहे.

काहींची पेरणी सुरू आहे. ही पेरणी या महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू राहील. काहींनी पेरणी डिसेंबरच्या अखेरीस केली. यामुळे पाऊस, ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती आहे. अनेक शेतकऱ्यांनी लहान फळबागांत आंतरपीक म्हणून पेरणीचे नियोजन केले. सोयाबीनचे बियाणे बाजारात कमी आहे. अनेकांनी आपल्याकडील बियाण्यांवर प्रक्रिया करून पेरणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT