Bajara Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Bajara Sowing : पुणे जिल्ह्यात उन्हाळी बाजरीची दोन हजार हेक्टरवर पेरणी

Bajara Production : खेड तालुका पेरणीत अव्वल; क्षेत्रात आणखी वाढीची शक्यता

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः उन्हाळी हंगामात रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पेरणीकडे अधिक ओढा असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दोन हजार ८७ हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये खेड तालुका अव्वल असून पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात बाजरीचे सरासरी चार हजार २३३ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार हजारांहून अधिक हेक्टरवर पेरणी केली होती. यंदाही जवळपास तेवढ्याच क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोग किडीचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकांवर होतो. त्याचा परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याऐवजी उन्हाळ्यात बाजरी पीक घेण्यावर भर दिला आहे. पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात रोग-किडीचा कमी प्रादुर्भाव आणि चांगले उत्पादन मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. याशिवाय चांगल्या दर्जाचा चाराही उन्हाळ्यात उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करत आहे.

यंदा खेड तालुक्यात सर्वाधिक लागवड बाजरीची झाली आहे. खेडमधील वाफगाव, कळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, सोयगाव, वेताळे अशा अनेक गावात मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली आहे. जुन्नरमध्येही नारायणगाव, खोडद, बोरी, बेल्हे, हिवरेतर्फे, आळेफाटा, मांजरवाडी, वारूळवाडी, ओतूर, रोकडी, उब्रज, डिंगोरे, आर्वी, कुरण, कांदळी, निमगाव चावा अशा बहुतांशी गावांत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर, नागापूर, अवसरी, धामणी, कळंब, मंचर, पेठ अशा अनेक गावांत मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली.


तालुकानिहाय उन्हाळी बाजरीची पेरणी, हेक्टरमध्ये
तालुका --- सरासरी क्षेत्र -- बाजरीची पेरणी

खेड -- ११३४ -- १४०६
जुन्नर -- २०६० -- ४८
आंबेगाव -- ६९७ -- ४४०
मावळ -- १७६ -- ६८
शिरूर -- ५९ -- ६३
बारामती -- ४ -- २३
इंदापूर -- ० -- ११
मुळशी -- २२ --- २८
एकूण --- ४२३३ -- २०८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT