Jowar Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : नापेर क्षेत्रात ज्वारी, हरभऱ्याची पेरणी

Chana Sowing : खानदेशात काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा कमी होतो. पीक फेरपालट करणे अनेकदा शक्य नसते. तसेच शेणखत व अन्य सेंद्रिय बाबींचा उपयोग होत नसल्याने जमीन सुपीकता टिकविण्यासंबंधी अडचणी येतात.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा खरिपात सुमारे सहा टक्के क्षेत्र नापेर होते. अनेक शेतकऱ्यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने क्षेत्र नापेर ठेवले असून, त्यात आता कोरडवाहू दादर ज्वारी, कोरडवाहू हरभरा पेरणी केली आहे. काहींनी केळीची लागवड केली आहे.

खानदेशात काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा कमी होतो. पीक फेरपालट करणे अनेकदा शक्य नसते. तसेच शेणखत व अन्य सेंद्रिय बाबींचा उपयोग होत नसल्याने जमीन सुपीकता टिकविण्यासंबंधी अडचणी येतात. या स्थितीत अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. नापेर क्षेत्र यंदाही अनेक भागात होते.

तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात नापेर क्षेत्र होते. या क्षेत्रात पूर्वमशागत करण्यात आली. अनेकांनी केळीसाठी खोल नांगरणी केली व शेत भुसभुशीत करून त्यात केळी लागवड केली आहे.

जळगाव तालुक्यासह अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागांतही अनेकांनी क्षेत्र भुसभुशीत करून घेतले होते व नंतर ते नापेर ठेवले. हे क्षेत्र तापल्यास त्यातील बुरशीजन्य समस्या, शत्रू किडींची समस्या दूर होते, असे शेतकरी मानतात. तसेच जमीन सुपीकतेला मदत होते.

नापेर क्षेत्रात कोरडवाहू रब्बी पिके जोमात येतात. कमी खर्च लागतो, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे यंदाही नापेर क्षेत्राचा प्रघात अनेक शेतकऱ्यांनी कायम ठेवला होता. खानदेशात १४ लाख हेक्टरवर खरिपातील पिके असतात.

यंदा पेरणीची टक्केवारी चांगली होती. ससरीपेक्षा अधिकचा पाऊस खानदेशात झाला. रब्बीतील पेरणीही पाऊसमान व ओलावा चांगला राहिल्याने बऱ्यापैकी आहे. नापेर क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये पूर्वमशागत झाली.

केळी, रब्बी पिकांची पेरणी मागील व या महिन्यात झाली आहे. नापेर क्षेत्रात दादर ज्वारी व हरभरा पीक अधिक आहे. या क्षेत्रातील पिके जोमात वाढतात व वेळेत पेरणी होत असल्याने पुढे वेळेत काढणी, मळणी होते. सुरवातीच्या दरांचा लाभही मिळविता, येतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT