Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : लातूर विभागात साडेबारा लाख हेक्टरवर रब्बी पेरण्या

Rabi Season 2024 : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या आता पूर्णत्वाकडे आल्या आहेत.

Team Agrowon

Latur News : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या आता पूर्णत्वाकडे आल्या आहेत. आतापर्यंत ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात १०४ टक्के पेरण्या झाल्या असून लातूर व हिंगोली जिल्ह्यात पेरणीचा टक्का नव्वदीच्या पुढे सरकला आहे.

धाराशिव व परभणी जिल्हे अजूनही ८५ टक्क्याच्या आतच आहेत. येत्या आठवड्यात आणखी पेरण्या संपण्याची शक्यता असून पेरणी झालेली पिकांची चांगली उगवण झाली आहे. दरम्यान ज्वारीवर काही भागात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

आतापर्यंत पाच जिल्ह्यात १३ लाख ६३ हजार ९६० पैकी बारा लाख ३३ हजार ६०१ हेक्टवर (९०.४४ टक्के) रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात हरभराची आठ लाख २५ हजार ८४४ हेक्टरवर पेरणी झाली असून सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ही पेरणी १०५ टक्के आहे.

कृषी विभागाने दिलेल्या साप्ताहिक अहवालाननुसार मागील आठवड्यात पाचही जिल्ह्यात हवामान थंड व कोरडे असल्याने पेरण्यांना चांगलाच वेग घेतला होता. सोयाबीन, खरीप ज्वारी व बाजरीची काढणी झाल्याने शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरण्यांना वेग देता आला. तुरीचे पीक सध्या फुलोऱ्यात व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून काही भागात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

कापूस वेचणी सध्या अंतिम टप्प्यात असून काही भागात वेचणीचे काम ६५ टक्क्याच्या पुढे आहे. आतापर्यंत रब्बी ज्वारीची सर्वसाधारण तीन लाख ७१ हजार ८५७ पैकी दोन लाख ७५ हजार ५९४ हेक्टरवर (७४.६५ टक्के) पेरणी झालेली आहे. ज्वारी सध्या रोप अवस्थेत आहे. गव्हाच्या पेरणीला यंदा कमी प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे.

विभागातील एक लाख ६५ हजार १९ पैकी ८८ हजार १२१ (५६.३० टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून हे पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे. हरभराची सात लाख ८६ हजार १२४ पैकी आठ लाख २५ हजार ८४४ (१०५.०५ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून हरभरा उगवणीच्या स्थितीत आहेत. येत्या काळात हरभराचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

तेलबियामध्ये सर्वाधिक करडईची १९ हजार ५३१ पैकी १९ हजार ३८५ (९९.२५ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरानंतर शेतकऱ्यांनी करडईलाही यंदा मागील हंगामाप्रमाणेच पसंती दिली आहे. दरम्यान परभणी व धाराशिव जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्यांना या आठवड्यात वेग मिळण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT