Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा

Rabi Season : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी संपली असून १ लाख ५६ हजार ६१५ हेक्टरवर पेरा झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी संपली असून १ लाख ५६ हजार ६१५ हेक्टरवर पेरा झाला आहे. परंतु पाण्याची कमतरता भासू लागल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. सध्या वाढत्या थंडीचा फायदा हरभरा आणि गहू पिकास उपयुक्त ठरत आहे. शिराळा तालुक्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पिके धोक्यात आली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर आहे. त्यापैकी रब्बी ज्वारीचे १ लाख २६ हजार ६६ हेक्टर आहे. यंदा परतीचा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उशिरा सुरू केली असल्याचे चित्र आहे. परंतु नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे आगाप पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. तर पावसामुळे पेरणीसाठी शेतकरी पुढे आले. जिल्ह्यात ज्वारीची १ लाख ९ हजार ४७ हेक्टरवर म्हणजे ८६ टक्के पेरणी झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरा झाला आहे. बागयाती क्षेत्रातील ज्वारी फुरोला तर उशिरा पेरणी झालेली ज्वारी पोटरीच्या अवस्थेत आहे.

मात्र, जिल्ह्यात पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. जत तालुक्यात ज्वारीच्या पिकांची वाढ खुंटली आहे. गहू पिकाची १३ हजार ८०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आगाप पेरणी केलेल्या गहू पोटरीच्या अवस्थेत आहे. तर उशिरा पेरणी केलेल्या गव्हाची वाढ होऊ लागली आहे.

हरभरा पिकाची १६ हजार ३३४ हेक्टरवर पेरा झाला आहे. सध्या थंडी वाढू लागली असल्याने गहू आणि हरभरा पिकास थंडी उपयुक्त ठरत आहे. १ लाख ५६ हजार ६१५ हेक्टरवर म्हणजे ८१ टक्के रब्बीचा पेरा झाला आहे. मात्र, पाणी टंचाईमुळे रब्बीतील पिके धोक्यात आली आहेत.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका पेरणी क्षेत्र

मिरज १९,८४१

जत ६९,९१७

खानापूर ६,०१६

वाळवा ९,३६५

तासगाव ६,९४१

शिराळा २,६१३

आटपाडी १२,८०३

कवठेमहांकाळ १७,६६३

पलूस ४,३९१

कडेगाव ७,०३५

एकूण १,५६,६१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT