Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : वाळव्यात ५२०० हेकटरवर रब्बीची पेरणी

Rabi Season : रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पडलेल्या परतीच्या पावसाने चांगली ओल झाल्याने वाळवा तालुक्यात रब्बी हंगाम साधायचा यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.

Team Agrowon

Sangli News : रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पडलेल्या परतीच्या पावसाने चांगली ओल झाल्याने वाळवा तालुक्यात रब्बी हंगाम साधायचा यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. तालुक्यात ५२०० हेकटर क्षेत्रावरील रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी उगवण पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी उगवणीच्या प्रतीक्षेत आहेत.

यावर्षी खरीप पेरणीच्या सुरुवातीला मॉन्सून पावसाने हुलकावणी दिली. अंतिम टप्प्यात पडलेल्या पावसाने खरीप कसाबसा हाताला लागला रब्बी हंगामाच्या सुरुवातीला परतीचा पाऊस आला आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. वाळवा तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असले तरी अनेक शेतकरी रब्बीची पिके घेतात. पीक फेरपालट तर कमी सिंचनाच्या ठिकाणी रब्बीच्या लागवडी होतात.

यावर्षी गाळप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दणका दिल्याने रस्त्याकडेला असणारे ऊसपीक तोडण्यात आले. त्यात काही शेतकऱ्यांची खोडवी तुटली त्या क्षेत्रात गहू-हरभरा या पिकांची पेरणीला प्राधान्य दिले. भविष्यात होणारी शेती पाण्याची टंचाई लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी लावणं गेल्यानंतर खोडवा काढून टाकला आहे.

त्यात घर खर्चासाठी आवश्यक गहू, खपली, हरभरा शाळू या पिकांची पेरणी केली आहे. बहुतांश पेरणी ही ट्रॅक्टर चलित यंत्राने केली आहे. पेरणी पूर्ण झालेल्या ठिकाणी पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

वाळवा तालुक्यात सध्या रब्बीला पोषक वातावरण आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर याचे नियोजन केले आहे. हळूहळू वाढणारी थंडी रब्बीला पूरक आहे. पाणी जपून वापरावे.
इंद्रजित चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, वाळवा, इस्लामपूर

पीक सरासरीक्षेत्र प्रत्यक्ष पेरणी शेरा

रब्बी ज्वारी २७०६ २१७९ ८०.५२

गहू ४२५८ १४४४ ३३.५१

मका ६८४ २८ ४.०९

हरभरा ५४०९ १६०८ २९.७३

एकूण १३०५७ ५२५९ ४०.२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT