Kolhapur Sowing Update Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sowing Update : कोल्हापूरच्या पश्चिम भागात पेरण्यांना गती येण्याची शक्यता

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त इतर पडणारी पावसाची रिपरिप शेतीसाठी दिलासादायक ठरत आहे. विशेष करून पश्चिम भागात सातत्याने अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरू आहे.

Team Agrowon

Kolhapur Sowing Update : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त इतर पडणारी पावसाची रिपरिप शेतीसाठी दिलासादायक ठरत आहे. विशेष करून पश्चिम भागात सातत्याने अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरू आहे.

सहा दिवसांपासून धरणांच्या पाणी पातळीत कमी अधिक प्रमाणात वाढ दिसून येत आहे. राधानगरी, दूधगंगा, कुंभी आणि पाटगाव प्रकल्पांत पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे.

गुरुवारी (ता. २९) सकाळी ८.३० पर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात आजरा तालुक्यात चिकोत्रा प्रकल्प परिसरात सर्वाधिक ८६ मिमी पावसाची नोंद झाली, तर सर्वांत कमी पावसाची नोंद चंदगडमधील जंगमहट्टी प्रकल्प परिसरात (८ मिमी) झाली.

राधानगरी पाणलोट क्षेत्रातही पावसाची अधूनमधून जोरदार सर येते. तर इतर वेळेला रिमझिम पाऊस कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात रखडलेल्या पेरण्यांची कामे प्रगती पथावर आहेत. वळीव किंवा मॉन्सूनपूर्व पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या मजूरांकडून पूर्ण करून घेण्याची वेळ आली आहे.

सध्या पडणारा अल्प प्रमाणातील पाऊस उसाला पोषक ठरत आहे. उसाला खतांची मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. दोन दिवसांनंतर जिल्ह्यात दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे फळभाज्यांसह इतर पिकांचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे कृषी सेवा केंद्रे फुल्ल झाली आहेत. तर सध्या शेतात तयार होत असलेल्या फळ भाज्यांसह इतर पाले भाज्यांवर किड पडू नये यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT