Organic Certification Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Certification : राज्याची लवकरच सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा

Organic Farming : गाझीयाबाद येथील संस्थेकडे पाठविला प्रस्ताव

Team Agrowon

State Organic Certification : राज्याची सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरण यंत्रणा लवकरच अस्तित्वात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा या संस्थेची नोंदणी करण्यात आल्यानंतर आता ‘नॅशनल सेंटर फॉर ऑर्गेनिक ॲण्ड नॅचरल फार्मिंग’ या गाझीयाबाद येथील संस्थेच्या अधिस्वीकृतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांची मान्यता मिळताच राज्यातही सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे काम गतिमान होणार आहे.

राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा ही बीजोत्पादकांसाठी काम करणारी स्वायत्त संस्था आहे. बीजोत्पादन शुल्कातूनच या या संस्थेतील कर्मचाऱ्यांचा पगार व इतर कामांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय होते.

त्याच धर्तीवर आता सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. संस्था नोंदणी अधिनियमाअंतर्गत महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा या संस्थेची नोंदणी जानेवारी २०२३ मध्ये करण्यात आली.

त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर ऑर्गेनिक ॲण्ड नॅचरल फार्मिंग या संस्थेकडे नोव्हेंबर २०२३ मध्ये अधिस्वीकृतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. या संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक डिसेंबर २०२३ मध्ये होणार होती.

परंतु ऐनवेळी ती रद्द झाली ही बैठक आता जानेवारी अखेर होणार असल्याचे सांगितले जाते. या बैठकीत अधिस्वीकृती विषयक मान्यता दिली जाईल. त्याआधारे संस्थेच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षणाअंती विविध पिकांसाठी प्रमाणीकरणाकरिता स्टॅण्डर्ड निश्‍चित केले जाणार आहेत.

सेंद्रिय शेती करताना कोणत्या निविष्ठांचा वापर करावा याविषयीची माहिती देखील या प्रशिक्षणातून दिली जाईल. देशाअंतर्गत बाजारपेठेसाठी हे प्रमाणपत्र उपयोगी ठरते. याआधारे नंतर ‘अपेडा’कडे नोंदणी करावी लागते.

त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतमाल निर्यातीकरिता अपेडाचे प्रमाणीकरण उपलब्ध होते, असे महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक सुनील सोनकुसरे यांनी सांगितले.

सेंद्रिय शेती प्रमाणीकरण या संस्थेची उपनिबंधकांकडे नोंदणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता एकदा गाझीयाबाद येथील संस्थेची अधिस्वीकृती मिळाली की प्रमाणीकरणाचे काम सुरू होईल. त्याआधारे देशाअंतर्गत सेंद्रिय शेतमाल विकता येणार आहे. त्याआधारे पुढच्या काळात अपेडाचे प्रमाणीकरण मिळाले की मग देशाबाहेरही प्रमाणित सेंद्रिय शेतमाल पाठविणे शक्‍य होणार आहे.
- सुनील सोनकुसरे,
प्रभारी संचालक, सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT