Swapnil Namdev Walunj Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Success Story : शिंदोडीच्या सुपुत्राचा स्पर्धा परीक्षेत डंका

MPSC Exam Update : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्नील नामदेव वाळुंज याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे.

Team Agrowon

Pune News : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्नील नामदेव वाळुंज याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. स्वप्नील वाळुंज याने या परीक्षेत राज्यात ६८ वा क्रमांक मिळवले आहे.

शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्नील वाळुंज याचे १ ते ७ वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिंदोडी येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण गुनाट येथील दत्त माध्यमिक विद्यालयात, उच्च माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशाला व अभियांत्रिकी शिक्षण पुणे येथील सिंहगड महाविद्यालयात झाले. स्वप्नील याला लहानपणापासून वाचनाची व क्रिकेटची आवड असल्याने त्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत याचा फायदा झाला.

माझ्या यशात कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, मित्र परिवार आणि शिंदोडी गावचे ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा असल्याचे स्वप्नील वाळुंज यांनी सांगितले. ज्या ज्या वेळेस निराशेचे क्षण आले. त्या वेळी माझे कुटुंब माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात प्रथमच शिंदोडी गावाचा डंका...

स्वप्नील वाळुंजच्या रूपाने शिंदोडी गावाने नाव प्रथमच महाराष्ट्र राज्यात झळकले. शेतकरी कुटुंबातील स्वप्नीलची आई गृहिणी, तर वडील शेतकरी आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या स्वप्नीलने सन २०१९ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली होती.

परंतु कोरोना महामारीमुळे सन २०२० आणि सन २०२१ या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे २०२२ मध्ये झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत स्वप्नीलने सहायक आयुक्त, (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) तसेच मंत्रालय कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक या तीन परीक्षांत घवघवीत यश मिळवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

SCROLL FOR NEXT