Solar Pump Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump Scheme : शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील ८ लाख ५० शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.

Dhananjay Sanap

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील ८ लाख ५० शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.

अजित पवारांनी शुक्रवारी (ता.२८) राज्य सरकारचा २०२४ चा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी अजित पवारांनी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची पुन्हा घोषणा केली. २०२४ च्या अर्थसंकल्पातही अजित पवारांनी या योजनेची घोषणा केली होती.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर सावध होत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, बेरोजगार तरुण आणि महिलांना खुश करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. महिला, शेतकरी, मागासवर्ग आणि तरुण यांचा विकास घडवून आणण्याचा उद्दिष्ट या अतिरिक्त अर्थसंकल्पाचे असल्याचे अजित पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT