Poultry Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farm : पोल्ट्री व्यावसायाला सौरऊर्जा प्रकल्‍प दिलासा ठरेल ; समन्‍वय समितीच्या बैठकीत व्यावसायिकांना विश्वास

Poultry Business : पोल्ट्री व्यावसायाला सौरऊर्जा प्रकल्‍प दिलासा ठरेल, असा विश्वास संगमनेरला झालेल्या पोल्ट्री व्यावसायिकांच्या राज्‍यस्‍तरीय समन्वय बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Team Agrowon

Ahmednagar News : पोल्‍ट्री व्यावसायिकांसाठी राज्‍य सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी करण्‍यास प्रारंभ केला असून, पो‍ल्‍ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्‍यासाठी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी विविध योजनांबाबत निर्णय करून, अंमलबजावणी सुरू केली आहे.

पोल्‍ट्री व्यावसायिकांसाठी राबविण्‍यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्‍प हा व्यावसायिकांच्या दृष्‍टीने मोठा दिलासा ठरेल, असा विश्‍वास राज्‍यस्‍तरीय कुक्कुट समन्‍वय समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

संगमनेर येथे पंचायत समितीच्‍या सभागृहात रविवारी (ता. २४) राज्‍यस्‍तरीय कुक्कुट समन्‍वय समितीची कार्यशाळा झाली. पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. सुनील तुंबारे, राज्‍यस्‍तरीय कुक्कुट समन्‍वय समितीचे सदस्‍य धनंजय आहेर, एकनाथ मुंगसे, सुदर्शन पोकळे, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. दशरथ दिघे, डॉ. येवले, डॉ. जोंधळे यांच्‍यासह पोल्‍ट्री चालक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

या कार्यशाळेत पशुसंवर्धनमंत्री विखे पाटील यांनी पोल्‍ट्री व्यावसायिकांच्या समस्‍यांसाठी राज्‍यस्‍तरावर प्रथमच समिती स्‍थापन करून, महत्त्वपूर्ण निर्णय घेण्‍यास प्रारंभ केल्‍याबद्दल व्यावसायिकांनी समाधान व्‍यक्‍त केले.

विभागाच्‍या माध्‍यमातून विविध योजनाही आता कार्यान्वित होत असल्‍याचे राज्‍य समितीचे सदस्‍य धनंजय आहेर यांनी सांगितले. यामध्‍ये प्रामुख्‍याने ग्रामपंचायतीच्‍या वतीने पोल्‍ट्री व्यावसायिकांना करपट्टी आकारली जाते. या बाबतही लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

शासनाच्‍या आदेशानुसार पोल्‍ट्रीसाठी वापरण्‍यात येणारे वजनकाटे प्रमाणित करून घेण्‍याची मोहीम राबविण्‍यात येणार असून, विशेष म्‍हणजे पोल्‍ट्रीचालकांसाठी शासनामार्फत सौरऊर्जा प्रकल्‍पाची योजना राबविण्‍यात येणार आहे.

यासाठी पोल्‍ट्री व्यावसायिकांची माहिती संकलित करण्‍याचे काम सुरू झाले असल्‍याचेही बैठकीत सांगण्यात आले. पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. सुनील तुंबारे यांनीही शासनाच्‍या निर्णयांची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यशाळेस पोल्‍ट्री व्यावसायिक तसेच कंपन्‍यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT