Solapur University Agrowon
ॲग्रो विशेष

Bio Science Research : जैवविज्ञानमधील संशोधन, प्रशिक्षणासाठी सोलापूर विद्यापीठाचा दोन संस्थांशी करार

Solapur University : नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन व प्रशिक्षण मिळावे, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन व प्रशिक्षणासाठी सीमा बायोटेक, कोल्हापूर आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटर, सोलापूर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन सभागृहात झालेल्या कराराप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, जैवविज्ञान संकुलाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील, सीमा बायोटेकचे संचालक विश्‍वास चव्हाण, इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चरचे डॉ. पुरुषोत्तम पाथरोटी, विद्यापीठाचे कायदा अधिकारी ॲड. जावेद खैरदी तसेच जैवविज्ञान संकुलामधील डॉ. प्रिया अय्यर, डॉ. रोहिणी शिवशरण, राजश्री अक्कलकोटे आदी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन व प्रशिक्षण मिळावे, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले. सीमा बायोटेकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी तसेच टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर याविषयी अधिक अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होईल.

त्याचबरोबर त्यांच्या बांबू प्रकल्प संशोधनावरही विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल, असे प्रा. डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.

याशिवाय इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्चच्या विविध प्रकल्प व उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांना संशोधन व अभ्यास करण्यास मिळणार आहे. त्यांच्या मिलेट रिसर्च (तृणधान्य संशोधन) याविषयी नवीन तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी मिळणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT