Ration Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Grain : रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

Ration Shop : रेशन प्रणालीतील धान्य वाटपात सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालय राज्यात प्रथम आले आहे.

Team Agrowon

Solapur News : रेशन प्रणालीतील धान्य वाटपात सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालय राज्यात प्रथम आले आहे. केंद्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अनुसार प्रत्येक महिन्याच्या ७ ते १५ तारीख हे अन्न सप्ताह म्हणून साजरा करणे हे दुकानदारांना अनिवार्य आहे.

अन्नसुरक्षा योजनेत लाभार्थींना आपण खात असलेले सकस व पौष्टिक धान्या बाबतची जागरूकता समजावणे हा मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु मागील दहा वर्षात राज्यभरात हे मोहीम राबवीत नसल्याचे स्पष्टपणे चित्र दिसून येत असताना, सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने ह्या मोहिमेला सकारात्मक भूमिका घेऊन ऑक्टोबर महिन्यात धान्य वाटपात राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.

अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी सुरवातीला रास्त भाव धान्य दुकानंदाराची बैठक घेऊन त्यांना लाभार्थीमध्ये या अन्नसप्ताह मोहिमेबाबत जनजागृती करण्याची सक्त सूचना देण्यात आली होती.

त्याप्रमाणे मागील अवघ्या दोनच महिन्यात नागरिकांमध्ये जनजागृती होऊन रेशन दुकानासमोर रांगा दिसत आहेत, जे दुकानदार जाणीवपूर्वक धान्य उशिरा वाटप करत आहेत, अशा सर्वांना कार्यालयाच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या. तर दुसरीकडे मात्र महिनाभर रेशन दुकानाचे हेलपाटे मारणाऱ्या लाभार्थींनी महिन्याच्या पंधरवड्यातच धान्य मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

सर्व लाभार्थींनी प्रत्येक महिन्याच्या ७ ते १५ तारखेतच धान्य उचल करावे, तसेच ज्यांनी अद्यापपर्यंत ईकेवायसी केले नाही, त्यांनी तत्काळ ईकेवायसी करून घ्यावे, न करणाऱ्याचे भविष्यात धान्य बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT