Grape Market Agrowon
ॲग्रो विशेष

Grape, Pomegranate Market : सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव; दरही टिकून

Fruit Market : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्ष, डाळिंबाला चांगला उठाव मिळाला. त्यांच्या आवकेतील चढ-उतार वगळता दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्ष, डाळिंबाला चांगला उठाव मिळाला. त्यांच्या आवकेतील चढ-उतार वगळता दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्षाची आवक रोज १ ते २ हजार पेंट्यापर्यंत राहिली. तर डाळिंबाची आवक एक ते दोन टनापर्यंत राहिली. द्राक्षाची आवक पंढरपूर, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर भागातून राहिली. तर डाळिंबाची आवक सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर भागातून झाली. सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आवकेत चढ-उतार असला, तरी मागणीत सातत्य असल्याने दर मात्र टिकून आहेत.

द्राक्षाला प्रतिचार किलोच्या पेटीला किमान १२० रुपये, सरासरी १७० रुपये आणि सर्वाधिक २३० रुपये, तर डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक १६ हजार रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय दोडका, वांगी, टोमॅटो, कारले यांचेही दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही रोज ५० ते १०० क्विंटलपर्यंत राहिली.

त्यात दोडक्याला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये, वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, कारल्याला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये, टोमॅटोला किमान २०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक ९०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

कांद्यालाही उठाव
कांद्याची आवक या सप्ताहात काहीशी वाढली. रोज १०० ते २५० गाड्यांपर्यंत आवक राहिली. त्याशिवाय त्यात सातत्यही काहीसे कमी राहिले. त्यामुळे कांद्याच्या दरात किंचित चढ-उतार राहिला, तरी दर बऱ्यापैकी राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज; कोकणात २ दिवस उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता

Grievance Redressal: तक्रारी निवारणाबरोबरच योजनांची अंमलबजावणी करा

Bajra Market Update: बाजरीची आवक सुरू, दर कमी

Rabi Crop Damage : देशातील २.४९ लाख हेक्टरवरील पिकांना अवकाळी आणि गारपीटीचा फटका; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी दिली मदतीची ग्वाही

Farmers Protest Warn: पंधरा दिवसांत मागण्या मान्य करा, अन्यथा राज्यभर आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT