VNMKV, Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV, Parbhani : ‘वनामकृवि’त आजपासून मृदशास्त्रज्ञांचा परिसंवाद

Soil Health : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या परभणी शाखेतर्फे गुरुवार (ता. २१) व शुक्रवारी (ता. २२) अन्न सुरक्षा आणि कृषी शाश्वततेसाठी मातीचे आरोग्य पुनरर्ज्जीवित करणे या विषयावर मृद शास्त्रज्ञांचा राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Parbhani News : परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या परभणी शाखेतर्फे गुरुवार (ता. २१) व शुक्रवारी (ता. २२) अन्न सुरक्षा आणि कृषी शाश्वततेसाठी मातीचे आरोग्य पुनरर्ज्जीवित करणे या विषयावर मृद शास्त्रज्ञांचा राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे उद्‌घाटन सकाळी १० वाजता कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या परभणी शाखेचे अध्यक्ष तथा मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रवीण वैद्य यांनी दिली.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्‍यक्षस्‍थानी राहतील. नवी दिल्‍ली येथील नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन संस्‍थेचे उपमहानिर्देशक डॉ. सुरेश कुमार चौधरी, कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्‍य डॉ. बी. एस. व्दिवेदी, जागतिक संशोधन कार्यक्रम, हैदराबाद येथील इक्रीसॅटचे संचालक डॉ. एम. एल. जाट आदींची उपस्थिती राहणार आहे.


महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतील तसेच भारतीय कृषी संशोधन संस्थांतील सुमारे २०० शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. विविध सत्रात विचारमंथन करणार आहेत. भविष्य काळात उद्योग आणि कृषी विकास यांना सुसंग तसेच जमीन व्यवस्थापन संबंधीचे धोरण निश्चित करण्यात मदत होईल.

माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, एनबीएसएस नागपूरचे संचालक डॉ. एन. जी. पाटील, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्‍थेचे संचालक डॉ. स्वामी रेड्डी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संस्‍थेचे माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. वंदना व्दिवेदी, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, संचालक बियाणे डॉ. देवराव देवसरकर, माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद ईस्माइल, डॉ. वैद्य, डॉ. अनिल धमक, डॉ. जी. आर. हानवते, डॉ. आर. एन. खंदारे, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. बी. आर. गजभिये, डॉ. पपिता गोरखेडे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्नेहल शिलेवंत, सहभागी होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT