MPKV Rahuri Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Science : मृद्‌विज्ञान विषयावर महात्मा फुले कृषी विद्यापीठात विशेष कार्यशाळा

MPKV Rahuri : या कार्यशाळेचे आयोजन भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा-राहुरी येथील मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे शाश्वत शेती व अन्य सुरक्षा यासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा (९ ते १० जानेवारी) आयोजित करण्यात आली आहे.

या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

या वेळी परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. ए वेलमुरुगन, पुणे येथील नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉ. रश्मी दरड, बारामती येथील राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी, नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन नियोजनाचे संचालक डॉ. एन.जी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

एकूण पाच सत्रामध्ये कामकाज पार पडणार आहे. या कार्यशाळेचे आयोजन भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा-राहुरी येथील मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या मार्फत करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी नाबार्ड, पुणे यांचे अर्थसाहाय्य लाभले आहे. या कार्यशाळेसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील ३५० शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

विविध विषयांवर होणार सादरीकरण

या कार्यशाळेत बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये मृदा व्यवस्थापन, माती व पाणी संवर्धन, जमिनीतील जैवविविधता, डिजिटल सॉईल सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मृदविज्ञानामध्ये वापर करणे, सेंद्रिय शेती, काटेकोर शेती, क्षारयुक्त जमिनींचे व्यवस्थापन, मृद सर्वेक्षण व भूमी नियोजन व माती मृदव्यवस्थापन संदर्भातील धोरणात्मक निर्णय या विषयावर झालेले संशोधन याविषयीचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT