Soil Health Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : माती हेच शेतीतील खरे भांडवल ; तिचे आरोग्य जपा

Soil Fertility : : माती माती ही शेतीमधील मूलभूत भांडवल आहे.मोसंबी बागेसाठी जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि संतुलित पीक पोषण महत्त्वाचे असल्याचे मत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक व मृदा शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Jalna News : माती माती ही शेतीमधील मूलभूत भांडवल आहे.मोसंबी बागेसाठी जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि संतुलित पीक पोषण महत्त्वाचे असल्याचे मत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक व मृदा शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांनी व्यक्त केले.

या वेळी शेतकऱ्यांनी बहार व्यवस्थापन, फूल गळ, फळगळ, रोग व कीड व्यवस्थापन, दर्जेदार फळ उत्पादन या बाबत प्रश्‍न विचारून शंका समाधान करून घेतले. डॉ कौसडीकर यांनी सध्या जालना परिसरातील मोसंबी बागेतील जमिनीचे आरोग्य बिघडलेले निदर्शनास आले असून सेंद्रिय कर्ब कमी झाले आहे.

सहा ते आठ अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहेत. त्यामुळे मोसंबी उत्पादनात अनेक अडचणी दिसून येत आहेत असे नमूद केले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनेतून बागेत जैविक आच्छादन, विद्यापीठ उत्पादित जैविक खताचा वापर, बायोमिक्सचा वापर आणि विशेष अन्नद्रव्य व्यवस्थापनात विद्राच्या खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वापर या विषयी सखोल मार्गदर्शन केले

कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर जिल्हा जालना येथे शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये मातीचे ढासळते आरोग्य व मोसंबी मधील मातीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता व ना म कृ वि. परभणी येथील वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ डॉ. कौसडीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच मोसंबी मधील सध्याच्या परिस्थितीतील भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना उपाय म्हणून मोसंबीचे एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे काळाची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कार्यक्रमांमध्ये मोसंबी मधील सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाच्या किडी व रोग याबाबत विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. सचिन धांडगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी यांनी केले. कार्यक्रमांमध्ये डॉ. कौसडीकर यांनी शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे समाधान सविस्तरपणे केले. कार्यक्रमास जिल्हा मोसंबी बागायतदार संघाचे अध्यक्ष पांडुरंग डोंगरे यांच्यासह जिल्ह्यातील मोसंबी बागायतदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT