Aatma Employee Welfare Associtation Agrowon
ॲग्रो विशेष

AATMA Employee Welfare : साहेब... शैक्षणिक पात्रता, अनुभव, सेवा कालावधीनुसार न्याय द्या

Atma Employees Demands : साहेब, आमची शैक्षणिक पात्रता, अनुभव, सेवा कालावधी, कर्तव्य व जबाबदाऱ्यानुसार न्याय करून आम्हाला सेवा नियमितीकरणासह विविध मागण्यांबाबत न्याय देण्यात यावा, अशी मागणी राज्यातील आत्मा कर्मचाऱ्यांनी केली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : साहेब, आमची शैक्षणिक पात्रता, अनुभव, सेवा कालावधी, कर्तव्य व जबाबदाऱ्यानुसार न्याय करून आम्हाला सेवा नियमितीकरणासह विविध मागण्यांबाबत न्याय देण्यात यावा, अशी मागणी राज्यातील आत्मा कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच सातत्याने मांडल्या गेलेल्या २० मागण्यांचा पाठपुरावाही आत्मा एम्प्लॉई वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आत्मा संचालकांकडे करण्यात आला आहे.

आत्मा एम्प्लॉई वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर गिरी यांच्या नेतृत्वात स्वाती जाधव, मकरंद ननावरे, जगदीश जाधव आदींनी आत्माचे संचालक अशोक किरणाळी यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत निवेदन सादर केले. राज्यातील आत्माअंतर्गत एकूण ५१८ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासकीय नियमानुसार कामाचा अहवाल यापूर्वीच सादर केल्याची बाबही असोसिएशनने आत्मा संचालकांच्या निदर्शनास आणून दिले.

राज्यातील आत्मा कर्मचाऱ्यांना एकीकडे पगार कपातीला सामोरे जावे लागत असताना महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा, अपघात, वैद्यकीय आणि नैमित्तिक रजा लागू नाहीत. अनेक कर्मचारी मृत्यू पावले असून काही कर्मचारी दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही. त्यामुळे सर्वांनाच या ना त्या कारणाने आर्थिक व पर्यायाने पारिवारिक व सामाजिक विवंचनाला सामोरे जावे लागत असल्याची बाबही आत्मा संचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

त्यामुळे राज्यस्तरीय अंतर कार्यालयीन कार्यकारणी गट (आयडीडब्ल्यूजी) समितीमध्ये मान्यता घेऊन कमी केलेले पगार पूर्ववत करावे तसेच वारंवार करण्यात आलेल्या २० मागण्यांवर न्यायोचित भूमिका घेऊन आत्मा कर्मचाऱ्यांना सेवा नियमितीकरण, सेवानिवृत्ती पश्‍चात लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून धोरणात्मक निर्णय होण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती आत्मा कर्मचाऱ्यांनी केली आहे.

१४ वर्षांपासून त्याच मानधनावर आम्ही काम करीत आहोत. याचिकांच्या नावाखाली न्यायालयाने न्याय देऊनही शासन, प्रशासन आम्हाला न्याय देत नसेल तर आमचा वनवास संपणार नाही का?
किशोर गिरी, उपाध्यक्ष, आत्मा एम्पलॉई वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT