Fruit Fly Control Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Fly Control : फळमाशी नियंत्रणासाठी ‘सिंधुरत्न’तून अनुदान

Sindhuratna Scheme : हापूसवरील फळमाशी नियंत्रणासाठी आंबा बागायतदारांना आता सिंधुरत्न योजनेमधून ७५ टक्के अनुदानावर प्रतिबंधात्मक साहित्य पुरविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : हापूसवरील फळमाशी नियंत्रणासाठी आंबा बागायतदारांना आता सिंधुरत्न योजनेमधून ७५ टक्के अनुदानावर प्रतिबंधात्मक साहित्य पुरविण्यात येणार आहे. यामध्ये चार फेरोमन सापळे आणि ४ लुर्स देण्यात येणार असून सामूहिकरित्या हा प्रयोग करण्यात येणार आहे.

१६ मे २०२१ रोजी तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळाची सर्वाधिक झळ कोकण किनारपट्टीला बसली होती. या वादळात मोठ्या प्रमाणात आंबा जमिनीवर पडला होता. त्या वेळी तज्ज्ञांनी पडलेल्या आंब्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याचा सल्ला दिला होता.

परंतु या आपत्तीत बहुतांश शेतकऱ्यांना ते शक्य झाले नाही. परंतु त्याचवर्षापासून फळमाशीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आंबा बागायतदार फळमाशीच्या वाढलेल्या प्रादुर्भावाशी संघर्ष करीत आहेत. फळमाशीमुळे आंब्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

त्यामुळे फळमाशीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. यासंदर्भात फळसंशोधन केंद्र, कृषी विभागाने सामूहिक कीडरोग व्यवस्थापनासह विविध पर्याय सूचविले होते. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी देखील फळमाशी नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती.

आता फळमाशी नियंत्रणासाठी सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत आंबा पिकावरील फळमाशीचे सामूहिकपणे नियंत्रण करण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर प्रतिहेक्टरी ४ फेरोमोन सापळे आणि ४ लुर्स अनुदानावर देण्यात येणार आहेत. हे फेरोमोन सापळे आणि लुर्स आंबा बागायतदारांनी सामूहिकपणे आपल्या आंबा बागेत लावायचे आहेत,

जेणेकरून सामूहिक स्वरूपात फळमाशीचा प्रादुर्भाव कमी होऊन फळमाशी आटोक्यात येण्यासाठी मदत होईल. फेरोमोन सापळे आणि लुर्सची मागणी करण्यासाठी बागायतदारांनी गावांतील कृषी सहायकाकडे सात-बारासह अर्ज करावा लागणार आहे.

फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला हे वास्तव असून त्यासाठी संपूर्ण आंबा बागेत फेरोमन सापळे आणि लुर्सचा वापर करणे आवश्यक आहे. व्यक्तिगतपेक्षा सामूहिक पद्धतीने ही उपाययोजना केल्यास फळमाशीचे नियंत्रण करणे सोपे होणार आहे. त्यामुळे बागायतदारांनी सामूहिक पद्धतीने हा प्रयोग करावा.
कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी, तालुका-देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT