Galyukta Shiwar Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Galyukta Shiwar Scheme : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेस भोगाव येथे सुरवात

Government Scheme : परभणी राज्य शासनाच्या गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार या मोहिमेचा प्रांरभ मंगळवारी (ता. ९) भोगाव (ता. परभणी) येथे करण्यात आला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी राज्य शासनाच्या गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार या मोहिमेचा प्रांरभ मंगळवारी (ता. ९) भोगाव (ता. परभणी) येथे करण्यात आला. या अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय जैन संघटना, जिल्हा परिषदेचे जिल्हा मृदा व जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्ररथाला जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानाचे सदस्य सचिव कविराज कुचे, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष नीरज पारख, जिल्हाध्यक्ष रोहीत गंगवाल, राजेश अंभुरे, विजय काला, मुकेश जैन आदी उपस्थित होते. गाळ उपसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च दोन्ही मिळून ३१ रुपये प्रती घनमीटर यानुसार असणार आहे.

गाळ वाहून नेण्यासाठी विधवा, दिव्यांग, आत्महत्याग्रस्त, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पसरविण्यात आलेल्या गाळाच्या ३५.७५ रुपये प्रति घनमीटर प्रमाणे एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत राहणार आहे.

हे अनुदान एक हेक्टर क्षेत्रफळासाठी ३७ हजार ५०० रुपये राहणार आहे. भारतीय जैन संघटनेमार्फत शेतकऱ्यांची मागणी आणण्याचे काम करण्यात येणार असून त्यासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

७५ एकर जमीन सुपीक होऊ शकते

भोगाव येथील तलावातील गाळ काढण्यासाठी अंदाजित किंमत २ लाख २७ हजार रुपये आहे. या तलावात ३९० घनमीटर साठवण क्षमता असून या तलावाच्या पाण्यावर ८४ हेक्टर अप्रत्यक्ष सिंचन होते. यापूर्वी या तलावात ४४ हजार घनमीटर गाळ होता.

काही वर्षापूर्वी लोकसहभागातून १४ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सध्या या तलावात ३० हजार घनमीटर गाळ आहे. हा गाळ काढून शेतात टाकल्यास ७५ एकर जमीन सुपीक होऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT