Mango Production Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Production : श्रीवर्धनमध्ये चार हजार टन आंबा उत्‍पादन

Mango Season : अनुकूल हवामानामुळे आंब्‍याला वेळेत मोहोर आला आहे. साधारण एप्रिल ते मेदरम्यान फळ काढण्यासाठी योग्य होईल, असा विश्वास श्रीवर्धनमधील बागायतदारांकडून व्यक्‍त होत आहे.

Team Agrowon

Shriwardhan News : अनुकूल हवामानामुळे आंब्‍याला वेळेत मोहोर आला आहे. साधारण एप्रिल ते मेदरम्यान फळ काढण्यासाठी योग्य होईल, असा विश्वास श्रीवर्धनमधील बागायतदारांकडून व्यक्‍त होत आहे. कृषी विभागाकडूनही यंदा आंब्‍याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होईल, असे सांगितले जात आहे.

रोठा सुपारी व बाणवली नारळानंतर येथे प्रामुख्याने आंब्‍याचे पीक घेतले जाते. तालुक्यात आंबा पिकाचे उत्पादनक्षम क्षेत्र २,८७० हेक्टर इतके होते. निसर्ग व तौक्‍ते चक्रीवादळात आंब्‍याच्या अनेक झाडांची पडझड झाली. सद्यःस्थितीत तालुक्यात आंब्याचे उत्पादनक्षम क्षेत्र १,९१० हेक्टर आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर सुस्थितीतील झाडांची जोपासना करीत व नव्याने आंबा लागवड करीत बागायतदारांनी येणाऱ्या हंगामाची प्रतीक्षा केली.

श्रीवर्धन तालुक्यातील डोंगर उताराच्या तसेच वरकस पडीक जमिनी आंबा पिकास योग्य आहेत. मोहोर येण्याचा काळ हा हवामान तसेच झाडांची निगा यावर अवलंबून आहे. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते.

मोहोर आल्यापासून सुमारे १०० ते १२० दिवसांत फळे काढण्यास योग्य होतात. सध्याचे पोषक वातावरण बघता, श्रीवर्धन तालुक्यात या वर्षी साधारण चार हजार टन आंबा उत्पादनाची बागायतदारांना अपेक्षा आहे.

सध्या आंब्याला पोषक वातावरण असल्यामुळे मोहोर चांगला येत आहे, परंतु बदलत्या वातावरणामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या सूचनांनुसार कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे.
- श्रद्धा डुंबरे, कृषी अधिकारी, श्रीवर्धन
यंदा श्रीवर्धन तालुक्यात चार हजार टन आंबा उत्पादन अपेक्षित आहे. साधारण एप्रिल ते मेदरम्यान फळ काढण्यासाठी योग्य होईल. चक्रीवादळानंतर या वेळी पहिल्‍यांदाच आंबा पिकासाठी पोषण वातावरण आहे.
- मंगेश कर्णेकर, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT