Seed Shortage Latur agrowon
ॲग्रो विशेष

Seed Shortage Latur : खरिपाच्या तोंडावर डीएपी,सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

Latur Agriculture News : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा जाणवत असून सोयाबीनच्या मागणी असलेल्या बियाण्यांचीही बाजारात वानवा आहे.

Team Agrowon

Latur Farmers : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा जाणवत असून सोयाबीनच्या मागणी असलेल्या बियाण्यांचीही बाजारात वानवा आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून यावर शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

बुधवारी (ता. २१) मुंबईत श्री. देशमुख यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्याची अडचण व जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

जिल्ह्यात खरीप पेरण्या तोंडावर आल्या असतानाच, डीएपी खताची उपलब्धता कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांमध्ये डीएपी खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असलेल्या सोयाबीनचे वाण ३३५ आणि एमएयूएस ७१ हे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत.

महाबीजसह इतर कंपन्यांच्या या मागणी असलेल्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागत आहे. पेरणीसाठी योग्य वेळी बियाणे न मिळाल्यास पीक उत्पादनावर थेट परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन डीएपी खते आणि सोयाबीनचे महाबीज व इतर मागणी असलेल्या बियाण्यांचा पुरेसा पुरवठा जिल्ह्यात उपलब्ध करावा, अशी मागणी देशमुख यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT