Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement Center : शहादा येथील कापूस खरेदी केंद्रास अल्प प्रतिसाद

Cotton Market : खानदेशात कापसाची आवक बाजारात वेगात सुरू आहे. परंतु त्यात शहादा (जि.नंदुरबार) बाजार समितीने ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू केलेल्या कापूस खरेदी केंद्रासही अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

Team Agrowon

Nandurbar News : खानदेशात कापसाची आवक बाजारात वेगात सुरू आहे. परंतु त्यात शहादा (जि.नंदुरबार) बाजार समितीने ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू केलेल्या कापूस खरेदी केंद्रासही अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

सुरुवातीला कापसाचे दर खानदेशात ७००० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल,असे होते. या काळात खेडा किंवा थेट खरेदी वेगात सुरू होती. त्यानंतर दर सतत कमी झाले. नोव्हेंबरमध्ये सरासरी दर खेडा खरेदीत सात हजार रुपये प्रतिक्विंटल, असा होता.

डिसेंबरमध्ये सरासरी दर ६९५० रुपये प्रतिक्विंटल,असा खेडा खरेदीत मिळाला. तर या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात सरासरी दर ६८०० रुपये प्रतिक्विंटल, असा खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला आहे. जे दर खेडा खरेदीत होते, तेच दर बाजार समितीत होते. यामुळे या खरेदी केंद्रास प्रतिसाद नव्हता.

शहादा तालुक्यात सर्वाधिक एक लाख १५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. एकरी सरासरी पाच क्विंटल कापूस उत्पादित झाला तरी साडेपाच लाख क्विंटलपर्यंत उत्पादन तालुक्यात निघते. खानदेश विभागात सर्वांत जास्त जिनर्स असलेल्या तालुक्यांपैकी शहादा एक तालुका आहे.

तालुक्यात १२ जिनर्स आहेत. सुमारे एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय दर वर्षी कापसातून होतो. सुमारे १५ लाख क्विंटल कापसाची प्रक्रिया होईल एवढी क्षमता तालुक्यातील जिनर्सची आहे. जशी अवस्था खानदेशात लिलाव खरेदी केंद्रीची आहे. तशीच स्थिती शासकीय केंद्रांची आहे. शासकीय खरेदी केंद्र खानदेशात अल्प आहेत. तेथे जाचक अटीमुळे कापसाची आवक मागील १० ते १५ दिवसात झालेली नाही.

सुरुवातीला खेडा खरेदीत दर ७००० रुपये प्रतिक्विंटल, होता. यामुळे या खरेदी केंद्रांत कुणी फिरकत नव्हते. परंतु आता बाजारातील दर घसरल्याने शासकीय खरेदी केंद्रांत शेतकऱ्यांनी विचारणा सुरू केली आहे. परंतु तेथे दर्जा, विविध निकष व इतर खर्च यामुळे शेतकरी कापूस आणत नसल्याची स्थिती आहे.

लिलाव पद्धती, पण ...

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिलेच लिलावाद्वारे कापूस खरेदी केंद्र दोंडाईचा रस्त्यावरील श्रीराम जिनिंग समोर सुरू झाले. त्यात शेतकऱ्यांसमोर लिलाव केले जात होते. परंतु या लिलाव पद्धतीचा लाभ शेतकऱ्यांना यंदा कमी दरांमुळे हवा तसा झालेला नाही, असाही मुद्दा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT