Orange Orchard Management Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Orchard Management : संत्रा मृग बहार व्यवस्थापन विषयावर शिवार फेरी

कृषी विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यातील बेलखेड येथे संत्रा मृग बहार व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा व शिवारफेरी घेण्यात आली.

Team Agrowon

Washim News : कृषी विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यातील बेलखेड येथे संत्रा मृग बहार व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा व शिवारफेरी घेण्यात आली.

कार्यशाळेच्या अध्यक्षपदी सरपंच सचिन सावळे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विद्यापीठाचे उद्यान विद्या अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई होते.

केव्हीकेचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक शंकर कोकडवार, ओंकार दिग्रसकर, फळबाग तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांची उपस्थिती होती.

सर्व प्रथम संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शिवार फेरी काढून विठ्ठलराव जाधव, जगन देव्हडे, संतोष देव्हडे, हरिभाऊ चव्हाण आदी शेतकऱ्यांच्या संत्रा बागांची पाहणी केली. डॉ. पंचभाई यांनी संत्रा छाटणीचे प्रात्यक्षिक दाखविले.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकात निवृत्ती पाटील यांनी केव्हीकेच्या माध्यमाने सुरु असलेल्या गट शेती उपक्रमाची माहिती दिली. तांत्रिक चर्चासत्रात डॉ. पंचभाई यांनी संत्रा पिकातील मृग बहार व्यवस्थापनाविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करताना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३० ते ४५ दिवसांचा पाण्याचा ताण देऊन झाडांना विश्रांती द्यावी.

गरज पडल्यास किंवा अवेळी पाऊस झाल्यास वाढरोधक संजीवकाचा वापर करावा. सल काढावी तसेच रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य पद्धतीने चर किंवा नाल्या काढाव्यात. पानांची संख्या व कार्यक्षमता वाढवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचे सांगितले. डॉ. काळे यांनी जमिनीच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले.

कोकडवार यांनी नाबार्डच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. काव्यश्री घोलप यांनीही मार्गदर्शन केले. सचिन सावळे यांनी केव्हीकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन जगदीश देव्हडे यांनी केले. तर आभार डॉ. नरेंद्र चव्हाण यांनी मानले.

कार्यशाळेसाठी विठ्ठलराव जाधव, गोपाल देव्हडे, राजकुमार देव्हडे, वसंता देव्हडे, श्रीकृष्ण बावस्कर, दिलीप जाधव, पंढरी जाधव, कैलाश देव्हडे, संजय देव्हडे, नामदेव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, जगन देव्हडे, संतोष देव्हडे, कृषी सहाय्यक इंगोले व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT