Thackeray Gat Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Cooperative Unions Election : भडगाव शेतकरी संघावर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

Shivsena Thackeray Gat : भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह एकत्र येत भाजपला जोरदार चपराक देत १२ जागा प्राप्त करून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

Team Agrowon

Election Jalgaon News : भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह एकत्र येत भाजपला जोरदार चपराक देत १२ जागा प्राप्त करून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधकांना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

येथील शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेलच्या १२ जागा निवडून आल्याने सत्ताधारी पॅनेलने पुन्हा सत्ता राखली.

राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या महाविकास आघाडीने हे यश मिळविले.

तर भाजपचे अमोल शिंदे यांच्या भडगाव सहकार विकास आघाडी पॅनेलच्या तीन जागा निवडून आल्या. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उडवत ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष केला.

भडगाव शेतकरी संघाच्या कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विकास पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, तुषार भोसले, इम्रानअली सय्यद, माजी नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, आमडद्याचे संजय पाटील आदी उपस्थित होते.

विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते)

सर्वसाधारण संस्था मतदार संघ : प्रताप पाटील (३३), खुमानसिंग पाटील (२८), प्रभाकर पाटील (२८), जयवंत पाटील (२७), देविदास माळी (२७), राजेंद्र परदेशी (२५). सर्वसाधारण व्यक्तिशः मतदार संघ ः भय्यासाहेब पाटील (१७७८), अमोल नाना पाटील (१६९२), अमोल सुरेश पाटील (१५७८), जयवंत पाटील (१५०३ ).

महिला राखीव : योजना पाटील (१८१७) व शुभांगी भोसले (१५९७). इतर मागासवर्ग : गुलाब पाटील (१६९३). अनुसूचित जाती, जमाती मतदार संघ : हिरामण पाटोळे (१७८३). विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग : रायचंद परदेशी (१७७५) मते मिळाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश कासार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT