Sugarcane Production agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शिरोळमध्ये १० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Rain Damage Sugarcane : हंगामातील पेरण्यांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी तयार असलेल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे १० हजार ४४० हेक्टर क्षेत्रातील पेरण्या रखडल्या आहेत.

sandeep Shirguppe

Sugarcane Damage Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात सर्वाधिक ऊस उत्पादक भाग म्हणून ओळखला जातो. परंतु यंदा पावसाने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे गणित बिघडवून टाकलं आहे. मागील काही दिवसात तालुक्यात सतत पाऊस पडत असून त्याचा शेती पीक आणि शेत जमीनीवर गंभीर परिणाम दिसून येत आहे. हंगामातील पेरण्यांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी तयार असलेल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे १० हजार ४४० हेक्टर क्षेत्रातील पेरण्या रखडल्या आहेत.

शिरोळ तालुक्यातील सुमारे ७ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची पेरणी पूर्ण झाली आहे. आडसाली ऊस ही विशिष्ट प्रकारची पीक पद्धत आहे, ज्यात पिकाच्या वाढीचे वेळापत्रक साधारणत: अधिक काळ टिकते आणि शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवून देते. मात्र, सध्या परतीच्या पावसामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. सतत पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक लावणीच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. विशेषत: पूर्व हंगामात होणाऱ्या पेरण्या पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.

शिरोळ तालुक्याचे कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे म्हणाले की, आधीच पेरण्या उशिराने होत असल्याने उत्पादनाचा काळ कमी होणार आहे, ज्यामुळे उत्पन्नात घट होऊ शकते. शिवाय, सततच्या पावसामुळे जमीन कमी सुपीक होण्याची शक्यता आहे, ज्याचा पुढील हंगामावरही परिणाम होऊ शकतो.

शेतकऱ्यांनी शेतातील साचलेले पाणी बाहेर काढूनच उसाची लागण करावी, लागण करताना संशोधन केंद्रातील बियाणांचा वापर करावा, जेणेकरून फसवणूक होणार नाही. बीज प्रक्रिया, वेळोवेळी खतांची मात्रा याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचे आवाहन जांगळे यांनी केले.

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आवश्यक ती तयारी केली होती, परंतु पावसाने शेतकऱ्यांचे सर्व नियोजन उधळून लावले आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने शेतातील पाणी निचरा करण्याचे प्रयत्नही अपयशी ठरत आहेत. त्यामुळे पुढील हंगामाची तयारी रखडली आहे. या परिस्थितीचा फटका केवळ उसाच्याच नव्हे, तर इतर पिकांनाही बसण्याची शक्यता आहे. पावसामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT