Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Swachhata Abhiyan : ग्रामस्वच्छता अभियानात शिरापूर, मांडवे गावांना पुरस्कार

Sant Gadge Baba Gram Swachhta Abhiyan : संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये २०१९-२० अंतर्गत आबासाहेब खेडकर पुरस्काराने जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) आणि माळशिरसमधील मांडवे ग्रामपंचायतीस ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये २०१९-२० अंतर्गत आबासाहेब खेडकर पुरस्काराने जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) आणि माळशिरसमधील मांडवे ग्रामपंचायतीस ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या झुंबर सभागृहात स्वच्छता दिंडीचा प्रारंभ नुकताच ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणेचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक भंडारी, उपायुक्त राहुल साकोरे, उपायुक्त विजय मुळीक, सोलापूरचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, पुणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टोणपे, यशदाचे समन्वयक श्‍याम पटवारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहायक गटविकास अधिकारी एस. एच. पदमवार, संवाद सल्लागार सचिन सोनवणे उपस्थित होते.

या प्रसंगी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) सोलापूरचे सरपंच विजयाताई ताकमोगे, ग्रामसेविका आम्रपाली भालशंकर, उपसरपंच सौदागर साठे, ग्रामपंचायत सदस्य वृषाली सावंत, लक्ष्मण कोळेकर, सागर काळे यांना सन्मानपत्र व ३० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुणे विभागामध्ये माळशिरस तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. या वेळी मांडवेचे माजी सरपंच धनश्री पालवे, शीतल दुधाळ, तानाजी पालवे, हणमंत टेळे, ग्रामसेवक बाळासाहेब भोसले, महादेव गायकवाड, पिंटू पालवे यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विभागीय स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT