Shetkari Sangh Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघ वाचणार की मोडकळीस येणार? संघासाठी उद्या मतदान

Kolhapur Shetkari : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि शेतकरी संघासाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि शेतकरी संघ वाचवण्याच्या नावाखाली सर्वपक्षीय नेते एकत्र आलेल्या शेतकरी सहकारी संघासाठी उद्या, रविवारी (ता. २१) मतदान होत आहे. जिल्ह्यातील ५९ केंद्रांवर संघाच्या १९ पैकी १७ जागांसाठी मतदान होणार आहे. २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

संघाच्या १७ जागांपैकी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. दरम्यान, सोमवारी (ता. २२) रमणमळा येथील शासकीय बहुद्देशीय सभागृहात मतमोजणी होत आहे.

मागच्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघाच्या निवडणुकीवरून घमासान सुरु आहे. अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय युवराज पाटील यांचा अर्ज अवैध झाल्यानंतर पुन्हा यात रंगत वाढत गेली. दरम्यान संघ वाचवण्यासाठी काहींनी थेट विद्यमान संचालकांवर आरोप केले तर काहींनी नेत्यांकडे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या सूचना केल्या होत्या.

शेतकरी संघाच्या १९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. संघाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निवडणूक खर्चासाठी ३० लाख रुपये अपेक्षित आहे, ही रक्कमही भरण्यासाठी की संघाकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न सुरू होते.

मात्र, यातून योग्य तोडगा निघाला नाही. संघाच्या इतर मागासवर्गीय गटातून सुनील मोदी व भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून राजसिंह शेळके हे बिनविरोध झाले आहेत. १७ जागांसाठी २८ जण रिंगणात आहेत. पॅनेल सोडून राहिलेल्या ११ पैकी पाच जणांनी एकत्रित येत पॅनेल केले आहे.

उद्या सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्यातील ५९ केंद्रांवर मतदान होत आहे. संघाचे ३६ हजार १८४ व्यक्ती सभासद, तर १,५७१ संस्था सभासद आहेत. साधारणतः ७५० मतदानासाठी एक केंद्र असे ५९ केंद्रावर मतदान होत आहे. त्यासाठी ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सोमवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात ४२ टेबलांवर मोजणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT