Onion  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या

Onion Rate : कांद्याला योग्य असा बाजारभाव मिळत नसल्यामुळे जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.

Team Agrowon

Pune News : कांद्याला योग्य असा बाजारभाव मिळत नसल्यामुळे जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शेतकरी संजय टेकुडे यांनी दोन एकर कांद्याच्या शेतात मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मोठया प्रमाणात कांदा लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक अर्थसंकटात सापडला आहे. सध्या कांद्याला किलोला फक्त १५ ते २५ रुपये बाजारभाव मिळत आहे.

परंतु वातावरणात नेहमी होणारे बदल यामुळे वेळोवेळी करावी लागत असलेली औषधे फवारणी, खतांचे वाढलेल्या किमती यासाठी मोठा खर्च येत असून सध्या मिळत असलेल्या भावात खर्च देखील फिटत नाही.

दरम्यान जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी शुक्रवारी झालेल्या मोढयांत एक नंबर कांद्यास दहा किलोस एक नंबर कांद्यास २४१ ते २७१ बाजारभाव मिळाला‌‌.दोन नंबर कांद्यास २०० ते २४१ रुपये बाजारभाव मिळला.

कांदा उत्पादन काढण्यासाठी खर्च वाढलेला आहे. खते, औषधे यांच्या किमती वाढलेल्या आहेत. लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च येत असून, यामध्ये औषधे, खते, मजुरांचे दरदेखील वाढलेले आहेत, तसेच कांदा निर्यात थांबविल्यामुळे कांद्याचे दर कोसळले असल्याने शासनाने निर्यातबंदी उठवत कांदा उत्पादकाला रास्त भाव देण्यात यावा, नाहीतर कांद्यालादेखील खर्चाच्या प्रमाणात हमीभाव द्यावा.
-संजय टेकुडे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT