Sugarcane FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : शरयू साखर कारखाना उसाला ३१५१ रुपये दर देणार

Sharayu Agro Sugar Factory : तालुक्यातील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज साखर कारखाना २०२३-२४ या चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी येणाऱ्या उसास प्रति टन तीन हजार १५१ रुपये एकरकमी व विनाकपात दर देणार असल्याची घोषणा कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी केली आहे.

Team Agrowon

Satara News : तालुक्यातील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज साखर कारखाना २०२३-२४ या चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी येणाऱ्या उसास प्रति टन तीन हजार १५१ रुपये एकरकमी व विनाकपात दर देणार असल्याची घोषणा कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी केली आहे.

प्रथम पंधरवड्यात आलेल्या उसाचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. ‘शरयू’ने अडचणीच्या काळात विविध तालुक्यांतील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप करून त्यांना आर्थिक स्थिरता देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

विविध शेतकरी संघटना प्रतिनिधींनी केलेली मागणी, तसेच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची जादा दर देण्याच्या मागणीचा शरयू प्रशासनाने सकारात्मकदृष्ट्या विचार केलेला असून, यापुढेही सर्वाधिक दर देऊन ऊसबिले वेळेवर अदा केली जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

फलटण, वाई, खंडाळा, भोर-वेल्हा, पुरंदर, जावळी, सातारा, कोरेगाव, माण, खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती आदी भागांतील कार्यक्षेत्रात ऊसतोडीसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे.

लवकरच वाढीव तोडणी यंत्रणा व अत्याधुनिक हार्वेस्टर मशिनच्या माध्यमातून तोडणी यंत्रणा कार्यरत होणार आहे. शेतकरी सभासदांनी आपला संपूर्ण ऊस ‘शरयू’ला गाळपासाठी घालून सहकार्य करण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT