Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : अजित पवार यांनी महाराष्ट्राचे प्रश्न मांडणं अपेक्षित होतं, मात्र दिल्लीवाऱ्या...; जीएसटी परिषदेवरून शरद पवार गटाची टीका

GST Council Meeting : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परीषदेची ५३ वी बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ज्यात राज्याचे अर्थमंत्री सहभागी झाले होते. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परीषदेची ५३ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठीकत व्यावसायिक आणि करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला. मात्र शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले नाहीत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बैठकीत राज्याचे प्रश्न मांडले नाहीत, अशी टीका शरद पवार गटाने केली आहे. तसेच अधिकृत एक्स ट्विटरवरून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

जीएसटी परीषदेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत व्यावसायिक सुविधा आणि करदात्यांचा विचार झाला. लहान करदात्यांसाठी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली. यावरून शरद पवार गटाने निशाना साधला. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली पोस्ट रिट्वीट करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक जीएसटी महाराष्ट्र राज्य करते. जे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मात्र पार पडलेल्या ५३ व्या जीएसटी कौन्सिल बैठकीत राज्याच्या हिताचे एकही निर्णय झाला नाही. तर शेतकरी आणि कष्टकरी सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. त्यांच्याही हिताचा एकही निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला नाही. पण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मोदी सरकार ३.० चे रेटून कौतुक सुरू असल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे.

तसेच अजित पवार यांच्यावर देखील निशाना साधताना, राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री फक्त दिल्लीवारी करण्यात धन्यता मानतात. त्यांनी दिल्लीतील जीएसटी कौन्सिल बैठकीस उपस्थित राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडणं अपेक्षित होते. परंतु अजित पवार यांनी या बैठकीस उपस्थित राहण्यास नापसंती दाखवल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे. तर राज्यातील महायुती सरकारचा हा ढोंगीपणा महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही, असेही शरद पवार गटाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT