Sharad Pawar agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : तासगाव साखर कारखान्याची दयनीय अवस्था करणाऱ्यांना जागा दाखवा; शरद पवार

Rohit Patil Sangli : माजी खासदारांना तुम्ही त्यांची जागा दाखवा. आणि तरूण तडफदार उमेदवार असलेल्या रोहीत पाटील यांना निवडूण द्या, असे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी आवाहन केले.

sandeep Shirguppe

Sangli Tasgaon Politics : तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी (ता. १५) मणेराजुरी येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी शरद पवार यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच पवार यांनी रोहित पाटील यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केलं.

यावेळी खासदार शरद पवार म्हणाले की, "मागच्या काही महिन्यांपूर्वी मी या भागात आलो होतो यावेळी बेदाणा आणि द्राक्षाच्या समस्या घेऊन काही शेतकरी माझ्याकडे आले. या शेतकऱ्यांनी मला सांगितल स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या नावाने बेदाणा मार्केट कमीटी काढणार आहे. यावर मी तुम्हाला सांगू इच्छीतो सांगलीकरांनी द्राक्षाची शेती कष्ट करून उभारली आहे. या भागातील बेदाणा आणि द्राक्षे जगभर प्रसिद्ध केली. या बेदाण्यासाठी इथले शेतकरी नवी मार्केट उभे करत आहेत. या शेतकऱ्यांनी रोहीत पाटील यांच्यासोबत राहावं मी तुमच्यासोबत असेन" असा शब्द शरद पवार यांनी दिला.

"सांगलीच्या लोकांनी संजय पाटील यांना काम करण्याची संधी दिली. साखर कारखाना इथे उभा केला परंतु या कारखान्याची काय अवस्था काय केली. सहकारी साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख होती परंतु या जिल्ह्यात तासगाव साखर कारखान्याची परिस्थिती बिकट होते ही गंभीर बाब आहे. साखर कारखान्याबरोबर इथल्या सहकारी संस्थांचीही माजी खासदारांनी या अवस्था केली हे तासगावकरांनी माहिती करून घ्यावं" असेही पवार म्हणाले.

"समाजाचं चुकीचं नेतृत्व करणारी व्यक्ती रोहीत पाटील यांच्या विरोधात उभी असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवा. रोहीत तरूण वयात लोकांच्या मनातले प्रश्न जाणून सेवा करत आहे. तासगाव तालुक्याची जनता स्वातंत्र्य काळापासून देशासाठी योगदान देत आहे. मोठा इतिहास असलेल्या जनतेने रोहीत पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत तुमच्या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी" असे पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT