Ajit Pawar News Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar Latest : प्रतिज्ञा पत्रावर लिहून देऊ का, मी राष्ट्रवादीतच!

NCP News : भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याबाबत अजित पवारांनी भाष्य करताना सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर परखड टीका केली.

Team Agrowon

Maharashtra Politics : आम्ही सर्वजण राष्ट्रवादीसोबतच आहोत. जिवात जीव आहे तोवर राष्ट्रवादीत राहणार. कामासाठी मला वेगवेगळ आमदार भेटले. त्याचा वेगळा अर्थ काढू नका, असा खुलासा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

मागील दोन आठवड्यापासून अजित पवारांच्या नावाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकून अजित पवार भाजपसोबत जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू होती. परंतु अजित पवार यांनी मंगळवार (ता.१८) दुपारी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना याबद्दल खुलासा केला.

भाजपसोबत जाऊन सत्तास्थापन करण्याबाबत अजित पवारांनी भाष्य करताना सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर परखड टीका केली.

अजित पवार म्हणाले, "४० आमदारांच्या सह्या असणारं कुठलंही पत्र नाही. माध्यमांनी आणि सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी ह्या वावड्या उठवल्या आहेत. मी राष्ट्रवादीत राहणार आहे. आता काय प्रतिज्ञा पत्रावर लिहून देऊ का?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडून सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचे पवार म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांचे गारपीट आणि वादळी पावसाने झालेले नुकसान, हरभरा खरेदी आदि मुद्द्यावरून अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

दरम्यान, अजित पवारांसदर्भात सुरू असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी थेटपणे सांगितले होते.

पवार म्हणाले "जयंत पाटील आणि अजित पवार यांना राज्यात होत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या तयारीची जबाबदारी दिली असून ते या कामांमध्ये व्यस्त असल्याचे पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

त्यामुळे बाहेर काय चर्चा होत आहे, याला मी महत्त्व देत नाही. पक्षाध्यक्ष म्हणून मी काय सांगतो ते महत्त्वाचं आहे," म्हणत भूमिका मांडली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT