Shahpur Murbad Bridge Agrowon
ॲग्रो विशेष

Shahpur Murbad Bridge : शहापूर-सापगाव पूल धोकादायक

Damaged Bridge : शहापूर- मुरबाड तालुक्याला जोडणारा सापगाव पूल हा पावसाळ्यात नियमित पाण्याखाली जातो. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असतात.

Team Agrowon

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा

Latest Agriculture News : शहापूर- मुरबाड तालुक्याला जोडणारा सापगाव पूल हा पावसाळ्यात नियमित पाण्याखाली जातो. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असतात. अशात आता पुलाच्या खालच्या बाजूचे प्लास्टर कोसळत असून त्यातील लोखंडी सळ्या दिसत आहेत. त्यामुळे हा पूल धोकादायक बनला असून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.

शहापूरजवळील सापगाव ते शहापूर या जुन्या पुलाचे आयुष्यमान संपुष्टात आले असून पुलाच्या संरक्षक कडा पाण्यात वाहून गेल्या आहेत. पुलाचे भातसा नदीतील पुलाचे खांब धोकादायक होत आहेत. त्यातच दोन महिन्यांपूर्वी ठाणे आणि मुंबई येथील जड वाहनांची वाहतूक याच पुलावरून वळविण्यात आली होती.

त्यामुळे हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने सद्यस्थितीत धोकादायक बनला असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसून पाच वर्षांपूर्वी सापगाव ते शहापूर रस्ता व त्यावरील पुलाचे काम हे एमएसआरडीसीकडे वर्ग केले असल्याची माहिती शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बळवंत कांबळे यांनी दिली.

वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग

पुलावरून तालुक्यातील डोळखांब, किन्हवली, शेणवा, कसारा, धसई भागातील नागरिक तसेच मुरबाड तालुक्यातील नागरिक, शालेय विद्यार्थी प्रवास करीत असतात. तसेच या रस्त्याने कल्याण-नगर मार्गावर जाता येत असल्याने येथून दुचाकी, चारचाकी, एसटी महामंडळाच्या बस अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते.

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

सापगाव पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून पुलाच्या कडेला दाट झाडी उगवली आहे. त्यामुळे पुलावरून प्रवाशांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावे. तसेच या ठिकाणी नवीन पुलाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे

पुलाचे प्राथमिक ऑडिट करण्यात आले असून, येत्या १५ दिवसांत त्याचा अहवाल येणार आहे. तसेच नवीन मंजूर पुलासाठी नवीन ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली असून १५ दिवसांत नवीन पुलाचे काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- संदीप पाटील, सहअभियंता, एमएसआरडी, ठाणे
दुरवस्था झाल्याने पुलावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. संबंधित विभागाने यावर तत्काळ उपाययोजना करावी. तसेच शहापूर-मुरबाड रोडवरील मंजूर पुलाचे काम लवकर सुरू करावे.
- मिलिंद देशमुख, तालुका संपर्कप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT